ETV Bharat / sitara

Pavankhind : पावनखिंड चित्रपटाची यशस्वी घौडदौड, राज्यभर झळकले हाऊसफुल्लचे बोर्ड

दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या 'पावनखिंड' (Pavankhind ) चित्रपटाला प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या चित्रपटाला पहिल्याच दिवशी महाराष्ट्रभरात तब्बल 1500 हून अधिक शो मिळाले. इतके शो मिळवणारा ‘पावनखिंड’ हा पहिलाच मराठी चित्रपट ठरला आहे. चित्रपट प्रदर्शित होताच सिनेमागृहांबाहेर ‘हाऊसफुल’चे बोर्ड झळकले आहेत.

पावनखिंड
पावनखिंड
author img

By

Published : Feb 22, 2022, 12:12 PM IST

मुंबई - 'फर्जंद' आणि 'फत्तेशिकस्त' (Farzand and Fatehshikast ) या चित्रपटांनंतर लेखक-दिग्दर्शक-अभिनेता दिग्पाल लांजेकर (Writer director Digpal Lanjekar) यांनी स्वराज्याच्या वाटेवरील तिसरे सुवर्णपान 'पावनखिंड' (Pavankhind ) चित्रपटाच्या निमित्ताने उलगडले आहे. पावनखिंडीचा रणसंग्रामाचा लढा आणि बाजीप्रभूं देशपांडेंच्या (Bajiprabhu Deshpande) स्वामीनिष्ठेची कथा मराठी जनमानसावर अधिराज्य गाजवित आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा जोरदार पाठिंबा मिळत असल्याचे पहायला मिळत आहे.

'१८ फेब्रुवारीला 'पावनखिंड' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाला पहिल्याच दिवशी महाराष्ट्रभरात तब्बल१५०० हून अधिक शो मिळाले. इतके शो मिळवणारा ‘पावनखिंड’ हा पहिलाच मराठी चित्रपट ठरला आहे. चित्रपट प्रदर्शित होताच सिनेमागृहांबाहेर ‘हाऊसफुल’चे बोर्ड झळकले आहेत.पहिल्याच दिवसापासून या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. बऱ्याच सिनेमागृहांबाहेर हाऊसफुल्लचा बोर्ड लागला आहे. या चित्रपटाला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे पुन्हा एकदा प्रेक्षक सिनेमागृहाकडे वळल्याचे पाहायला मिळत आहे.

पहिल्या दिवशी १५०० शोमध्ये झळकलेल्या पावनखिंड चित्रपटाला रविवारी चक्क १९१० शो मिळाले. चित्रपटाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी आपल्या सोशल मीडियावर ही बातमी दिली होती. त्यांन लिहिले, ''रसिक प्रेक्षकहो, तुमच्या प्रतिसादामुळे पावनखिंड चे रविवारी विक्रमी १९१० शोज् लागले आहेत. खूप खूप धन्यवाद!!!!''

अभिनेते अजय पूरकर यांनी या चित्रपटात बाजीप्रभू देशपांडेंची भूमिका साकारली आहे. चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, अंकित मोहन, अक्षय वाघमारे, वैभव मांगले, हरीश दुधाडे, बिपीन सुर्वे, सचिन भिलारे, अजिंक्य ननावरे, सुनील जाधव, माधवी निमकर, प्राजक्ता माळी, रुची सवर्ण, उज्ज्वला जोग, दीप्ती केतकर, सुरभी भावे, क्षिती जोग, समीर धर्माधिकारी, आस्ताद काळे, ऋषी सक्सेना,शिवराज वायचळ, संतोष जुवेकर, राजन भिसे, विक्रम गायकवाड, आदी कलाकारांच्या 'पावनखिंड' चित्रपटात भूमिका आहेत.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

संगीत आणि पार्श्वसंगीताची जबाबदारी देवदत्त मनिषा बाजी यांनी सांभाळली आहे. छायांकन अमोल गोळे तर संकलन प्रमोद कहार यांचे आहे. गीते संतश्रेष्ठ तुकाराम महाराज, दिग्पाल लांजेकर, देवदत्त मनिषा बाजी यांची आहेत. वेशभूषा पौर्णिमा ओक तर रंगभूषा सानिका गाडगीळ यांनी केली आहे. ध्वनि आरेखन निखील लांजेकर आणि हिंमाशू आंबेकर यांचे आहे. कलादिग्दर्शनाची जबाबदारी प्रतीक रेडीज यांनी सांभाळली आहे. साहसदृश्ये बब्बू खन्ना यांची आहेत. नृत्यदिग्दर्शनाची जबाबदारी किरण बोरकर, सिद्धी पोतदार, दिग्पाल लांजेकर, अक्षय गुप्ता यांनी सांभाळली आहे. विशेष दृश्य मिश्रण भूषण हुंबे यांनी केले आहे.

आलमंड्स क्रिएशन्स निर्मित आणि ए.ए.फिल्म्स प्रस्तुत 'पावनखिंड'ची निर्मिती अजय आरेकर, अनिरुद्ध आरेकर आणि भाऊसाहेब आरेकर यांनी केली असून १८ फेब्रुवारीला 'पावनखिंड' चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे.

हेही वाचा - Anmol Ambani Khrisha Wedding : अनमोल अंबानी आणि ख्रीशा शाह यांच्या लग्नाला दिग्गज सेलिब्रिटींची हजेरी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.