मुंबई - बॉलिवूडचे बरेच कलाकार काही ना काही कारणामुळे सोशल मीडियावर ट्रोल होत असतात. अभिनेता अर्जुन कपूरही याच ट्रोलिंगमुळे सध्या चर्चेत आला आहे. त्याचा आगामी 'पानिपत' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर अर्जुनच्या लूकवरून काही जणांनी त्याला ट्रोल केलं. या ट्रोलिंगवर अखेर अर्जुन कपूरने मौन सोडलं आहे.
'पानिपत'च्या लूकवरुन ट्रोल होणाऱ्या अर्जुनने म्हटलं की 'सोशल मीडियावर कलाकारांना ट्रोल करण्याची लोकांना सवय झाली आहे. आपल्या वैयक्तिक आयुष्यात अशा लोकांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे ते सोशल मीडियावर आपली नकारात्मक टीका व्यक्त करत असतात. मी अशा ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करत असतो. मात्र, एतिहासिक व्यक्तींनी आपल्या प्राणाची बाजी लावून इतिहासात नाव अजरामर केले आहे. अशा व्यक्तींचा तरी आदर ठेवावा', असे त्याने म्हटले आहे.
हेही वाचा -विद्युत जामवालची दमदार अॅक्शन असलेल्या 'कमांडो ३' मधील व्हिडिओ प्रदर्शित
पानिपतच्या तिसऱ्या लढाईवर आधारित हा चित्रपट आहे. ही लढाई जानेवारी १४ १७६१ रोजी भारतातील हरियाणा राज्यातील पानिपत नजीक झाली. याच गावानजीक पहिले दोन युद्धे झाली होती, ज्यात मुघलांची सरशी झाली होती आणि भारतात मुघल सत्तेचा पाया घातला गेला होता. तिसरी लढाई अफगाण सेनानी अहमदशाह अब्दाली आणि महाराष्ट्रातील मराठ्यांत झाली. अहमदशाह अब्दालीने पेशव्यांचा व पर्यायाने मराठी साम्राज्याचा मोठा पराभव केला. या पराभवानंतर मराठा साम्राज्याची एकसंधता नष्ट झाली.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
हेही वाचा -रानू मंडल यांनी गायलं मल्याळम गाणं, नवा व्हिडिओ व्हायरल