ETV Bharat / sitara

'अराररारा खतरनाक'! 'मुळशी पॅटर्न'च्या गाण्यानं ओलांडला २५ मिलियन व्ह्यूजचा टप्पा

‘मुळशी पॅटर्न’ आता या चित्रपटातील अबालवृद्धांनी डोक्यावर घेतलेल्या 'अरारारारा खतरनाक' या गाण्याने आपल्या लोकप्रियतेची घौडदौड कायम राखत नुकताच २५ मिलियन व्ह्यूजचा टप्पा पार केला आहे.

'अराररारा खतरनाक' गाण्यानं ओलांडला २५ मिलियन व्ह्यूजचा टप्पा
author img

By

Published : May 16, 2019, 2:39 PM IST

मुंबई - प्रविण विठ्ठल तरडे लिखित, दिग्दर्शित, अभिनित ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले. या चित्रपटाला विविध पुरस्कार सोहळ्यातही सन्मानित करण्यात आले. तर आता या चित्रपटातील अबालवृद्धांनी डोक्यावर घेतलेल्या 'अरारारारा खतरनाक' या गाण्याने आपल्या लोकप्रियतेची घौडदौड कायम राखत नुकताच २५ मिलियन व्ह्यूजचा टप्पा पार केला आहे.

आयटम साँगच्या धर्तीवर बनलेल्या या भाईटम साँगची खासियत म्हणजे यात शहरातील सगळ्यात मोठ्या भाईचा वाढदिवस असतो आणि त्या दिवशीच्या जल्लोषावर आधारलेले हे गाणे आहे. त्यामुळे या गाण्यात खास भाई स्टाईल डान्स पाहायला मिळतो. प्रविण विठ्ठल तरडे हे या गाण्यापूर्वी लेखक, अभिनेता, दिग्दर्शक म्हणून सर्वांना परिचित होते, पण या भाईटम साँगच्या निमित्ताने पहिल्यांदाच त्यांचा डान्स संपूर्ण महाराष्ट्राला पाहायला मिळाला.

हे गाणं रिलीज झालं तेव्हा पुणे आणि मुळशी पट्ट्यातील अनेक गुन्हेगार या गाण्यात दिसल्याने त्यावर वाद निर्माण झाला होता. पोलिसांनी तो भाग गाण्यातून काढून टाकण्यास तरडेंना सांगितले आणि तरडेंनी तो काढूनही टाकला. मात्र या वादाचा गाण्याच्या लोकप्रियतेवर तसूभरही परिणाम झाला नाही. उलट हे गाणं उत्तरोत्तर अधिकच लोकप्रिय झालं. या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन उमेश जाधव यांनी केले असून नरेंद्र भिडे यांनी गाण्याला संगीत दिले आहे तर आदर्श शिंदे यांनी हे अफलातून गाणं गायलं आहे. त्याचीच पावती या गाण्याच्या निर्मात्यांना २५ मिलियन व्ह्यूजच्या रुपात मिळाली आहे.

Intro:प्रविण विठ्ठल तरडे लिखित, दिग्दर्शित, अभिनित ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले. या चित्रपटाला विविध पुरस्कार सोहळ्यातही सन्मानित करण्यात आले. या चित्रपटातील अबालवृद्धांनी डोक्यावर घेतलेल्या ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘ या गाण्याने आपल्या लोकप्रियतेची घौडदौड कायम राखत नुकताच २५ मिलियन व्हूजचा टप्पा पार केलाय.

आयटम सॉंगच्याच धर्तीवर बनलेल्या भाईटम सॉंगची खासियत म्हणजे यात शहरातील सगळ्यात मोठ्या भाईचा वाढदिवस असतो आणि त्या दिवशीच्या जल्लोषावर आधारलेले हे गाणे आहे, त्यामुळे या गाण्यास खास भाई स्टाईल डान्स बघायला मिळतो. प्रविण विठ्ठल तरडे हे या गाण्यापूर्वी लेखक, अभिनेता, दिग्दर्शक म्हणून सर्वांना परिचित होते, पण या भाईटम सॉंगच्या निमित्ताने पहिल्यांदाच त्यांचा डान्स संपूर्ण महाराष्ट्राला बघायला मिळाला.

हे गाणं रिलीज झालं तेव्हा पुणे आणि मुळशी पट्ट्यातील अनेक गुन्हेगार या गाण्यात दिसल्याने त्यावर वाद निर्माण झाला होता. पोलिसांनी तेवढा भाग गाण्यातून काढून टाकण्याची विनंती तरडेना केली होती जी त्यानी त्वरित मान्यही केली होती. मात्र या वादाचा गाण्याच्या लोकप्रियतेवर तसूभरही परिणाम झाला नाही. उलट हे गाणं उत्तरोत्तर अधिकच लोकप्रिय झालं.

या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन उमेश जाधव यांनी केले असून नरेंद्र भिडे यांनी गाण्याला संगीत दिले आहे तर आदर्श शिंदे यांनी अफलातून गायले आहे. गीतकार प्रणीत कुलकर्णी यांनी ‘अराररारा अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘ हे गीत लिहिले आहे. या गाण्याने सोशल मिडीया, संगीत वाहिन्या आणि विविध म्युझिक अॅप्सवर ट्रेंड करत गाण्याने सर्वत्र धुमाकूळ घातला. आजही अनेक वाढदिवसाच्या पार्टीत हे गाणे हमखास लावतात तसेच विविध डान्स स्पर्धामध्ये लहान मुले यावर थिरकताना दिसतात. त्याचीच पावती या गाण्याच्या निर्मात्याना 25 मिलियन व्यूजच्या रुपात मिळाली आहे. Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.