मसूरी: दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या 'द काश्मीर फाइल्स'च्या शूटिंगसाठी सध्या प्रसिद्ध अभिनेता अनुपम खेर मसूरीमध्ये आहे. शनिवार व रविवारसाठी मसूरीमध्ये वाहनांची लांबलचक रांग लागली होती. त्यामुळे ट्रॅफिक जाम झाले. अशा परिस्थितीत शूटिंगच्या ठिकाणी पोहोचताना अनुपम खेर यांनी आपली कार सोडून स्थानिक तरुणांकडून लिफ्ट मागितली आणि शूटिंगच्या ठिकाणी पोहोचले.
या दरम्यान अनुपम खेर यांनी स्थानिक तरुण हिमांशूशी संवादही साधला. अनुपम खेर म्हणाले की बर्याच दिवसानंतर ते दुचाकीवर बसले आणि त्यांना खूप बरे वाटले.
हेही वाचा -'वंडर वूमन 3' मधून धमाका करायला पुन्हा परतली गाल गॅडोट
त्याचवेळी हिमांशुने सांगितले की हा दिवस त्यांच्यासाठी खूप खास होता. कारण इतका मोठा अभिनेता त्याच्याबरोबर दुचाकीवर बसला होता. अनुपम अनुपम खेरला घेऊन जात असताना बसवाल्यांनी राँग साईडने दुचाकी न चालवण्याचा सल्ला दिला. यावर अनुपम खेर म्हणाले की काहीही होऊ शकते त्यामुळे सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. त्यांनी शुटिंगच्या ठिकाणी पोहोचल्यावर सीनही शुट केला. यावेळी प्रचंड गर्दी पाहायला मिळाली.
हेही वाचा -रजनीकांत यांचे पत्नी लता यांनी आरती करुन केले स्वागत, फोटो व्हायरल