ETV Bharat / sitara

अंकुश चौधरी - पल्लवी पाटील यांची भावनिक केमेस्ट्री, 'ट्रिपल सीट'चं गाणं प्रदर्शित - tiple seat film

'रोज वाटे' असे या गाण्याचे बोल आहेत. बेला शेंडेने हे गाणं गायलं आहे. या चित्रपटाला अविनाश विश्वजित यांचे संगीत आणि पार्श्वसंगीत लाभले आहे. तर गुरु ठाकूर, मंदार चोळकर, अश्विनी शेंडे, विश्वजित जोशी यांची गीते आहेत.

अंकुश चौधरी - पल्लवी पाटील यांची भावनिक केमेस्ट्री, 'ट्रिपल सीट'चं गाणं प्रदर्शित
author img

By

Published : Oct 6, 2019, 4:31 PM IST

मुंबई - महाराष्ट्राचा स्टाईल आयकॉन असलेला अभिनेता अंकुश चौधरी एक हटके विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यंदाच्या दिवाळीत त्याचा 'ट्रिपल सीट' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. या चित्रपटात अंकुशसोबत २ अभिनेत्री झळकणार आहेत. या चित्रपटातील अंकुश आणि पल्लवी पाटील यांची भावनिक केमेस्ट्री असलेलं गाणं अलिकडेच प्रदर्शित करण्यात आलं आहे.

'रोज वाटे' असे या गाण्याचे बोल आहेत. बेला शेंडेने हे गाणं गायलं आहे. या चित्रपटाला अविनाश विश्वजित यांचे संगीत आणि पार्श्वसंगीत लाभले आहे. तर गुरु ठाकूर, मंदार चोळकर, अश्विनी शेंडे, विश्वजित जोशी यांची गीते आहेत.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

हेही वाचा - अंकुश चौधरीसोबत 'ट्रिपल सीट'वर बसणाऱ्या ‘त्या’ दोघी कोण? याची उत्सुकता!

'ट्रिपल सीट' चित्रपटात अंकुश चौधरी, शिवानी सुर्वे, पल्लवी पाटील यांच्यासह प्रविण विठ्ठल तरडे, राकेश बेदी यांच्या भूमिका आहेत. नरेंद्र शांतीकुमार फिरोदिया यांची निर्मिती असलेल्या 'ट्रिपल सीट'ची कथा, पटकथा, संवाद आणि क्रिएटीव्ह दिग्दर्शन अॅड. अभिजित अरविंद दळवी याचे आहे. तर, सहनिर्माता स्वप्नील संजय मुनोत आणि सहाय्यक निर्माता अॅड. पुष्कर श्रीपाद तांबोळी आहेत.

अनुष्का मोशन पिक्चर्स आणि एंटरटेनमेंट, अहमदनगर फिल्म कंपनी निर्मित ‘ट्रिपल सीट’ यंदाच्या दिवाळीत २५ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

  • सादर करीत आहोत, या वर्षातील सर्वात रोमँटिक गाणं...!

    वायरलेस प्रेमाची गोष्ट - ट्रिपल सीट
    लवकरच तुमच्या जवळच्या सिनेमागृहातhttps://t.co/KqWe5Pzj0H pic.twitter.com/JDuVD6lX2p

    — Ankush (@imAnkkush) October 5, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा - 'ट्रीपल सीट'च्या प्रदर्शनाची तारीख अखेर ठरली

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.