मुंबई - छोट्या पडद्यावरुन घराघरात पोहोचलेल्या अंकिता लोखंडे हिने 'मणिकर्णिका - द क्विन ऑफ झांशी' या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर एन्ट्री केली. या चित्रपटात तिने झलकारी बाईची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचंही कौतुक झालं. आता पुन्हा एका चित्रपटात तिची वर्णी लागली आहे. त्यामुळे तिला पुन्हा पडद्यावर पाहण्याची संधी चाहत्यांना मिळणार आहे.
अंकिता लवकरच श्रद्धा कपूर आणि टायगर श्रॉफच्या 'बागी ३' चित्रपटात भूमिका साकारणार आहे. सध्या या चित्रपटाचं शूटिंग सुरू आहे. 'बागी' आणि 'बागी २' च्या यशानंतर आता 'बागी ३' देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये टायगर आणि श्रद्धा मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. त्यांच्यासोबतच अंकिताचीही महत्वपूर्ण भूमिका दिसणार आहे.
-
#Update: Ankita Lokhande joins #Baaghi3 cast... Stars Tiger Shroff, Shraddha Kapoor and Riteish Deshmukh... Directed by Ahmed Khan... Produced by Sajid Nadiadwala... Co-produced by Fox Star Studios.
— taran adarsh (@taran_adarsh) September 24, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#Update: Ankita Lokhande joins #Baaghi3 cast... Stars Tiger Shroff, Shraddha Kapoor and Riteish Deshmukh... Directed by Ahmed Khan... Produced by Sajid Nadiadwala... Co-produced by Fox Star Studios.
— taran adarsh (@taran_adarsh) September 24, 2019#Update: Ankita Lokhande joins #Baaghi3 cast... Stars Tiger Shroff, Shraddha Kapoor and Riteish Deshmukh... Directed by Ahmed Khan... Produced by Sajid Nadiadwala... Co-produced by Fox Star Studios.
— taran adarsh (@taran_adarsh) September 24, 2019
हेही वाचा -नागा साधूच्या भूमिकेतील सैफ अली खानच्या 'लाल कप्तान'चा ट्रेलर प्रदर्शित
अहमद खान हे या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटाच्या सेटवरुन चित्रपटातील कलाकारांचे फोटोही शेअर करण्यात आले होते. पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होईल.
हेही वाचा -वयाच्या ८१ व्या वर्षीही 'या' दिग्गज अभिनेत्रीला करायचंय स्कुबा डायव्हिंग