ETV Bharat / sitara

'सोंदर्याचा कहर, चोरीत ग्लॅमर', पाहा 'चोरीचा मामला' चित्रपटाचा दुसरा टीझर - चोरीचा मामला चित्रपट

अमृताची या चित्रपटात ग्लॅमरस भूमिका पाहायला मिळणार आहे. दुसऱ्या टीझरमध्येही तिचा हा लूक पाहायला मिळतो.

Amruta Khanvilakar share second teaser of choricha mamla
'सोंदर्याचा कहर, चोरीत ग्लॅमर', पाहा 'चोरीचा मामला' चित्रपटाचा दुसरा टीझर
author img

By

Published : Dec 22, 2019, 5:21 PM IST

मुंबई - अभिनेता जितेंद्र जोशी लवकरच 'चोरीचा मामला' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात तो चोराची भूमिका साकारत आहे. त्याचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाल्यानंतर पहिला टीझरही प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. अमृता खानविलकरचीही यामध्ये महत्वपूर्ण भूमिका आहे. तिने या चित्रपटाचा दुसरा टीझर पोस्ट केला आहे.

अमृताची या चित्रपटात ग्लॅमरस भूमिका पाहायला मिळणार आहे. दुसऱ्या टीझरमध्येही तिचा हा लूक पाहायला मिळतो. तिने आजवर बऱ्याच चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. 'चोरीचा मामला' या चित्रपटात ती 'श्रद्धा'च्या भूमिकेत दिसणार आहे. ही भूमिका विनोदी तसेच ग्लॅमरस असणार आहे.

हेही वाचा -जितेंद्र जोशीचा 'चोरीचा मामला', 'या' अभिनेत्रीची असणार मुख्य भूमिका

प्रियदर्शन जाधव या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. त्यांनी यापूर्वी 'मस्का' चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट प्रस्तुत आणि स्वरुप स्टुडिओज निर्मित सुधाकर ओमळे, आकाश पेंढारकर, सचिन नारकर, विकास पवार यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. प्रियदर्शननेच चित्रपटाचे लेखन तर, चिनार महेश यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे. ३१ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा -कंगनाच्या 'पंगा'चं नवं पोस्टर, नीना गुप्तांनी शेअर केला फोटो

Intro:Body:

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.