ETV Bharat / sitara

अमृता रावने केले लॉकडाऊनच्या काळातील घरभाडे माफ - लॉकडाऊनच्या काळातील घरभाडे माफ

कोरोना व्हायरसच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात आहेत. अनेक भाड्याने राहणारे लोक घरभाडे देऊ शकत नाहीत. यासाठी अभिनेत्री अमृता रावने आपल्या घरभाडेकरुंचे भाडे माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.

Amrita Rao
अमृता राव
author img

By

Published : Jun 23, 2020, 8:42 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री अमृता राव यांनी मार्च ते जुलै या कालावधीत आपल्या भाडेकरुंचे भाडे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण ते लॉकडाऊनमध्ये अडकले आहेत आणि आर्थिक संकटाला तोंड देत आहेत.

अभिनेत्री अमृता राव म्हणाली, माझे काही भाडेकरु फ्रिलान्स अभिनय आणि छायाचित्रण यासारख्या व्यवसायात आहेत. अशा व्यवसायांना मासिक उत्पन्नाची हमी नसते. सर्वत्र (साथीची रोग) सर्वत्र भयानक परिस्थिती आहे आणि त्यांनी आपल्या कुटुंबियांसह घरी परतण्याचा निर्णय घेतला. ही परिस्थिती समजून घेऊन त्यांना मदत करण्याचा निर्णय मी घेतला आहे.

तथापि, तिने हे देखील नमूद केले: "ज्या भाडेकरूंनी फ्लॅट ताब्यात घेतलेले आहेत आणि नोकरी गमावली नाहीत त्यांनी लॉकडाउनचा उपयोग केवळ थकबाकी न देणे आणि घरमालकाला अनावश्यकपणे त्रास देणे यासाठी वापरू नये, हा देखील लॉकडाऊन मधील एक धोका आहे."

अभिनेत्री अमृता राव हिने ठाकरे या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीसोबत काम केले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.