ETV Bharat / sitara

अमिताभ हा व्हिडिओ पाहून म्हणतात, 'अतिसुंदर'!

author img

By

Published : Jul 16, 2019, 9:25 AM IST

अमिताभ बच्चन यांनी पाणी वाचवा संदेश देणाऱ्या व्हिडिओचे कौतुक केले आहे. काही दृष्यांमध्ये पाणी वाचवण्याचे महत्त्व अनोख्या पध्दतीने यात दाखवण्यात आले आहे.

अमिताभने केले व्हिडिओचे कौतुक

मुंबई - अमिताभ बच्चन आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमी चांगल्या गोष्टींचे कौतुक करीत असतात. सुनंदा यादव या युजरने त्यांना एक व्हिडिओ टॅग केलाय, त्याला प्रतिक्रिया देत बिग बी यांनी 'अतिसुंदर' म्हटले आहे.

पाणी वाचवा असा संदेश देणारा हा व्हिडिओ आहे. आपल्या देशात पाण्याचा प्रश्न अनेक ठिकाणी भीषण आहे. पाऊस जिथे पडतो तिथले पाणी वाहून जाते. ते साठवण्याची व्यवस्था केली जात नाही. यावर भाष्य करणारा हा साधा, सुंदर आणि बोधपर असा हा व्हिडिओ आहे.

एक व्यक्ती छत्री घेऊन जात असताना वाऱ्याने त्याची छत्री उडते आणि एका ठिकाणी उलटी पडते. पाऊस सुरू असल्यामुळे त्या छत्रीत पाणी साठायला सुरू होते. ती व्यक्ती ते पाणी न फेकता तसेच घरी घेऊन जायला लागतो. हे पाहून रस्त्यावर जाणारे अनेकजण छत्रीमध्ये पाणी साठवायला लागतात. हे पाहून ज्याला ज्यात शक्य आहे त्या वस्तूत पाणी साठवायला लागतो. अशा या व्हिडिओला अमिताभ यांनी म्हटलंय, 'अतिसुंदर...पाणी वाचवा'.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.