ETV Bharat / sitara

'केबीसी'ची बदलणार सिग्नेचर ट्यून, आता अनोख्या अंदाजात प्रदर्शित होणार शो - कौन बनेगा करोडपती news

सर्वसामान्यांच्या स्वप्नांना उभारी देणारा शो म्हणून 'केबीसी'ची ओळख आहे. यावेळी कार्यक्रमात थोड्या प्रमाणात बदल झालेले पाहायला मिळतील. कार्यक्रमाची सिग्नेचर ट्यून आणखी खास बनवण्यासाठी प्रसिद्ध संगीतकाराची जोडी अजय-अतुल यांनी आपले विशेष योगदान दिले आहे.

'केबीसी'ची बदलणार सिग्नेचर ट्यून, आता अनोख्या अंदाजात प्रदर्शित होणार शो
author img

By

Published : Aug 9, 2019, 10:39 AM IST

मुंबई - छोट्या पडद्यावरील लोकप्रिय ठरलेला शो 'कौन बनेगा करोडपती'चा ११ वा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'दवीयो' और 'सज्जनो' अशी साद घालत आपल्या भारदस्त आवाजात अमिताभ बच्चन यांचे सुत्रसंचालन आणि अंगावर रोमांच उभी करणारी 'केबीसी'ची ट्यून या सर्वांनी आत्तापर्यंत चाहत्यांवर छाप पाडली. यावेळी मात्र, या सिग्नेचर ट्यूनमध्ये थोडा बदल होताना दिसणार आहे. नुकताच या कार्यक्रमाचा नवा प्रोमो प्रदर्शित झाल आहे.

सर्वसामान्यांच्या स्वप्नांना उभारी देणारा शो म्हणून 'केबीसी'ची ओळख आहे. यावेळी कार्यक्रमात थोड्या प्रमाणात बदल झालेले पाहायला मिळतील. कार्यक्रमाची सिग्नेचर ट्यून आणखी खास बनवण्यासाठी प्रसिद्ध संगीतकाराची जोडी अजय-अतुल यांनी आपले विशेष योगदान दिले आहे.

यासंदर्भात बोलताना त्यांनी सांगितले, की 'ही आमच्यासाठी खूप सन्माननीय बाब आहे. केबीसीच्या ट्यूनसाठी आमच्याशी जेव्हा संपर्क साधण्यात आला तेव्हा या ट्यूनला आणखी खास कसे बनवावे हा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, आम्ही यासाठी ट्यून बनवण्यात यशस्वी झालो. प्रेक्षकांनाही नवी ट्यून नक्की आवडेल', असेही ते म्हणाले.

शोच्या नव्या प्रोमोमध्ये महानायक अमिताभ बच्चनची यांची नेहमीप्रमाणे दमदार शैली पाहायला मिळते. आत्तापर्यंतचे १० ही सिझन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. आता ११ व्या सीझनलाही चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळेल, अशी आशा निर्मात्यांनी व्यक्त केली आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.