मुंबई - बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. आपले विचार चाहत्यांपर्यंत पोहोचण्यासाठी वेळोवेळी ते आपल्या पोस्ट शेअर करतात. दरवेळी हिंदी किंवा इंग्रजी भाषेतून ट्विट करणाऱ्या बिग बींनी यावेळी मात्र मराठीत ट्विट करुन आपला विचार मांडला आहे. त्यांच्या या मराठमोळ्या ट्विटवर चाहत्यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत.
बिग बींनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलंय, की 'खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात तो म्हणजे ...“लोक काय म्हणतील?”
-
T 3298 - खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात तो म्हणजे ...“लोक काय म्हणतील?”
— Amitabh Bachchan (@SrBachchan) September 24, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Many people's dreams remain unfulfilled with this one thought, "What will people say?"
">T 3298 - खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात तो म्हणजे ...“लोक काय म्हणतील?”
— Amitabh Bachchan (@SrBachchan) September 24, 2019
Many people's dreams remain unfulfilled with this one thought, "What will people say?"T 3298 - खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात तो म्हणजे ...“लोक काय म्हणतील?”
— Amitabh Bachchan (@SrBachchan) September 24, 2019
Many people's dreams remain unfulfilled with this one thought, "What will people say?"
हेही वाचा- नागा साधूच्या भूमिकेतील सैफ अली खानच्या 'लाल कप्तान'चा ट्रेलर प्रदर्शित
वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं, तर लवकरच ते 'ब्रम्हास्त्र' चित्रपटा रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तसेच नागराज मंजूळे यांच्या 'झुंड' या मराठी चित्रपटातही त्यांची भूमिका आहे. यामध्ये ते प्रशिक्षकाची भूमिका साकारताना दिसणार आहेत.
छोट्या पडद्यावरील 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमाचंही ते सुत्रसंचालन करत आहेत. सध्या या कार्यक्रमाची लोकप्रियता मोठ्या प्रमाणावर असल्याची पाहायला मिळते.
हेही वाचा- वयाच्या ८१ व्या वर्षीही 'या' दिग्गज अभिनेत्रीला करायचंय स्कुबा डायव्हिंग