ETV Bharat / sitara

'गर्लफ्रेन्ड' मिळवण्यासाठी अमेयने वाढवलं ८ किलो वजन - गर्लफ्रेंड

'गर्लफ्रेन्ड' पटवण्यासाठी आजकालचे तरूण काय काय फंडे वापरतील काही सांगता येत नाही. अमेयनेही त्याची 'गर्लफ्रेन्ड' पटवण्यासाठी पुर्वीपेक्षा हटके लूक केला आहे.

काहीही करून 'गर्लफ्रेंड' मिळवण्यासाठी अमेयने आठ किलो वजन वाढवलं
author img

By

Published : May 19, 2019, 5:21 PM IST

मुंबई - 'दिल दोस्ती दुनीयादारी' या मालिकेतून 'कैवल्य'च्या भूमिकेद्वारे अमेय वाघ घराघरात पोहोचला होता. अमेयने छोट्या पडद्यासह मोठ्या पडद्यावरही त्याच्या अभिनयासह ठसा उमटवला आहे. लवकरच तो 'गर्लफ्रेन्ड' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा धमाल टीजर अलिकडेच प्रदर्शित झाला आहे. या टीजरमध्ये अमेयचा नेहमीपेक्षा हटके लूक पाहायला मिळाला. त्याच्या या लूकची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

'गर्लफ्रेन्ड' पटवण्यासाठी आजकालचे तरूण काय काय फंडे वापरतील काही सांगता येत नाही. अमेयनेही त्याची 'गर्लफ्रेन्ड' पटवण्यासाठी पुर्वीपेक्षा हटके लूक केला आहे. यासाठी त्याने तब्बल ८ किलो वजन वाढवले आहे. त्याने त्याचा पुर्वीचा लूक आणि आत्ताचा लूक असलेला एक फोटो सोशल मीडियावर शेअर करून चाहत्यांच्या प्रतिक्रिया विचारल्या आहेत.

Amey Wagh
अमेयने शेअर केलेले फोटो

अमेय वाघ मराठी फिल्म्स इंडस्ट्रीचा युवा चेहरा म्हणून ओळखला जातो. प्रायोगिक नाटकाची पार्श्वभूमी असलेल्या अमेयने आजवर अनेक नाटकांमध्ये, मालिकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये काम केले. 'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेतील कैवल्यच्या भूमिकेने तो घराघरात पोहोचला. 'मुरांबा' आणि 'फास्टर फेणे' मधील त्याच्या भूमिका प्रेक्षकांचा चांगल्याच पसंतीस उतरल्या.

Amey Wagh
अमेयचा नवा लूक

आता 'गर्लफ्रेंड' या चित्रपटातून अमेय पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटासाठी अमेयने खास तयारी केलेली दिसते. त्याची वाढलेली दाढी आणि विशेष आकाराचा चष्मा हा त्याचा लुक सध्या सर्वांच्याच चर्चेचा विषय बनला आहे.

Amey Wagh
अमेयचा नवा लूक

'गर्लफ्रेंड'चे लेखन आणि दिग्दर्शन उपेंद्र सिधये यांनी केले आहे. या चित्रपटाची निर्मिती अनिश जोग आणि रणजीत गुगळे यांनी केली आहे. त्यांनी यापूर्वी 'टाईम प्लीज', 'डबल सीट', 'yz', 'मुरांबा' आदी चित्रपटांची निर्मिती केली आहे. या चित्रपटात अमेयची 'गर्लफ्रेंड' नक्की कोण आहे? याचीही चर्चा सध्या सोशल मिडीयावर चांगलीच रंगल्याचे दिसते. आता एवढे सगळे करून तरी अमेयला त्याची स्वप्नातली परी मिळावी, अशी त्याच्या फॅन्सची इच्छा आहे.

Intro:गर्लफ़्रेंड चा टीजर बाघितला का? त्या फिल्मसाठी मी आठ किलो वजन वाढवलं होतं ! आता back to normal ! फरक कसा वाटतोय ब्रोच्यांनो? ही अभिनेता अमेय वाघ याची सोशल मिडीया मधील पोस्ट सध्या चर्चेत आहे. अमेय वाघ मराठी फिल्म्स इंडस्ट्रीचा युवा चेहरा म्हणून ओळखला जातो प्रायोगिक नाटकाची पार्श्वभूमी असलेल्या अमेयने आजवर अनेक नाटकांमध्ये, मालिकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये काम केले.

‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेतील कैवल्यच्या भूमिकेने तो घराघरात पोहोचला. ‘मुरांबा’ आणि ‘फास्टर फेणे’ मधील त्याच्या भूमिका प्रेक्षकांचा चांगल्याच पसंतीस उतरल्या.

आगामी ‘गर्लफ्रेंड’ या चित्रपटातून अमेय पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून, या चित्रपटासाठी अमेयने खास तयारी केलेली दिसते. कलाकार, नेहमीच आपल्या भूमिकेशी समरस होण्यासठी तयारी करताना दिसतात, त्यावत वजन घटवणे, शरीरयष्टी बनवणे हा प्रकार मोठ्या प्रमाणात होताना दिसतो. मात्र, आगामी ‘गर्लफ्रेंड’ या चित्रपटासाठी अमेयने आपले वजन वाढवल्याचे दिसते.

अमेय ‘गर्लफ्रेंड’ चित्रपटाच्या टीझर आणि पोस्टर मध्ये बराच सुदृढ झालेला दिसतो, शिवाय त्याची वाढलेली दाढी आणि विशेष आकाराचा चष्मा हा त्याचा लुक सध्या सर्वांच्याच चर्चेचा विषय बनला आहे. ‘गर्लफ्रेंड’चे लेखन आणि दिग्दर्शन उपेंद्र सिधये यांनी केले आहे.

या चित्रपटाची निर्मिती अनिश जोग आणि रणजीत गुगळे यांनी केली आहे. त्यांनी यापूर्वी ‘टाईम प्लीज’, डबल सीट’, ‘yz’, ‘मुरांबा’ आदी चित्रपटांची निर्मिती केली आहे. या चित्रपटात अमेयची ‘गर्लफ्रेंड’ नक्की कोण आहे? याचीही चर्चा सध्या सोशल मिडीयावर चांगलीच रंगल्याचे दिसते. आता एवढं सगळं करून तरी अमेयला त्याची स्वप्नातली परी मिळावी अशी त्याच्या फॅन्सची इच्छा आहे..Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.