मुंबई - अभिनेत्री आलिया भट्ट तिचे वडील आणि दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेल्या 'सडक -२' चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचे काही महिन्यांपूर्वीच शूटिंग सुरू झाले होते. आता या चित्रपटाचे उटी येथील शूटिंग शेड्युल पूर्ण झाले आहे. आलियाने पहिल्यांदाच वडिलांच्या दिग्दर्शनाखाली भूमिका साकारली आहे. त्यामुळे शूटिंग पूर्ण झाल्यानंतर तिने महेश भट्ट यांच्यासाठी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
![alia bhatt pens emotional post for mahesh bhatt](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/3971312_alia.jpg)
आलियाने महेश भट्ट यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. तसेच, उटी येथील फोटो देखील तिने पोस्ट केले आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
'सडक २' हा महेश भट्ट यांच्याच 'सडक' चित्रपटाचा सिक्वेल आहे. 'सडक'मध्ये संजय दत्त आणि पुजा भट्ट यांची मुख्य जोडी झळकली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता.
आता 'सडक २'मध्ये आलियासोबत संजय दत्तची देखील महत्वपूर्ण भूमिका राहणार आहे. तर, आदित्य रॉय कपूर हा देखील या चित्रपटात दिसणार आहे.