ETV Bharat / sitara

काश्मीरमध्ये सापडला बॉलिवूडचा हुबेहुब 'खिलाडी' - लक्ष्मी बाँब

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारसारखा हुबेहुब दिसणारा व्यक्ती सध्या सोशल मीडियामुळे चर्चेत आला आहे. त्या व्यक्तीचा फोटो पाहुन चाहतेही संभ्रमात पडले आहेत.

काश्मीरमध्ये सापडला बॉलिवूडचा हुबेहुब 'खिलाडी'
author img

By

Published : Aug 30, 2019, 8:46 AM IST

मुंबई - जगात आपल्या चेहऱ्यासारखे एकुण ७ चेहरे असतात असं म्हटलं जातं. जगाच्या विविध कोपऱ्यात आपल्या चेहऱ्यासारखा चेहरा शोधणं फार अवघड आहे. कधीकधी मात्र, असे चेहरे अचानक आपल्या समोर येत असतात. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारसारखा हुबेहुब दिसणारा व्यक्ती सध्या सोशल मीडियामुळे चर्चेत आला आहे. त्या व्यक्तीचा फोटो पाहुन चाहतेही संभ्रमात पडले आहेत.

'माजिद मीर' असे अक्षय कुमारसारख्या दिसणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्या आणि अक्षयच्या चेहऱ्यात भरपूर समानता आहे. त्यामुळे त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर यावर अक्षयच्या चाहत्यांच्या भरभरुन प्रतिक्रिया येत आहेत. मजेशीर गोष्ट म्हणजे हा व्यक्ती अक्षय कुमारचा चाहता नसून क्रिकेटर सुनील गावस्कर यांचा चाहता आहे.

Akshay kumar's kashmiri looklike
ट्विटरवरील प्रतिक्रिया
Akshay kumar's kashmiri looklike
ट्विटरवरील प्रतिक्रिया

हेही वाचा -सावधान : शूटर आणि रिव्हॉल्वर आज्जी दिवाळीत धडकणार तुमच्या शहरात

सध्या अक्षय कुमार आपल्या 'मिशन मंगल' चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. लवकरच तो 'सूर्यवंशी', 'लक्ष्मी बाँब' यांसारख्या चित्रपटातून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हेही वाचा - सारा म्हणते, म्हणून लहान रोल असतानाही केलं 'सिंबा'मध्ये काम

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.