मुंबई - अॅक्शन चित्रपटांसाठी ओळखला जाणारा दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या आगामी 'सूर्यवंशी' चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून प्रेक्षकांना आतुरता आहे. मागच्या वर्षी प्रदर्शित झालेल्या 'सिंबा' चित्रपटातच 'सूर्यवंशी'ची झलक पाहायला मिळाली होती. त्यामुळे कधी एकदा हा चित्रपट सिनेमागृहात दाखल होतोय याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. अशाच चित्रपट निर्मात्यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. तसेच या चित्रपटाचा ट्रेलर केव्हा प्रदर्शित होणार हे देखील जाहीर केले आहे.
'सूर्यवंशी' चित्रपटात बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार मुख्य भूमिकेत आहे. मागच्या वर्षीच या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले होते. रोहित शेट्टीच्या कॉप ड्रामातील हा चौथा चित्रपट आहे. अक्षय कुमार या चित्रपटात 'डीसीपी सूर्यवंशी'च्या भूमिकेत दिसणार आहे. 'सिंघम'ची भूमिका साकारणारा अजय देवगन आणि 'सिंबा'ची भूमिका साकारणारा रणवीर सिंग यांचीही यामध्ये पाहुण्या कलाकारांची भूमिका पाहायला मिळणार आहे. एकाच चित्रपटात रोहित शेट्टीचे तिन्ही पोलीस दिसणार असल्यामुळे या चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
हेही वाचा -'तुझी दररोज आठवण येते', श्रीदेवींच्या आठवणीत जान्हवी भावुक
नुकताच या चित्रपटाचा नवा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवी तारीख जाहीर करण्यात आली आहे. हा चित्रपट आता २४ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २५ मार्चला गुढीपाढवा असल्यामुळे चित्रपट निर्मात्यांनी एक दिवस आधीच चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापूर्वी २ मार्चला या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होणार आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
रणवीर सिंगने 'सूर्यवंशी'चा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये अक्षय कुमार, अजय देवगन, रणवीर सिंग आणि कॅटरिना कैफ यांची झलक पाहायला मिळते. यंदाचा हा ब्लॉकबस्टर सिनेमा असेल, असा अंदाज सोशल मीडियावर व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा - 'इंडियन आयडॉल 11 ' चा विजेता ठरला भटिंडाचा सनी हिंदुस्तानी