मुंबई - भारतीय हॉकी संघातील महान खेळाडू बलबीर सिंग सिनिअर यांचे सोमवारी निधन झाले. वयाच्या 95 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमी ऐकून दुःख झाल्याचे अभिनेता अक्षय कुमारने म्हटले आहे. अक्षयने ट्विटरवर सिंग यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे.
बलबीर सिंग यांच्या निधनाची बातमी ऐकून खूप दुःख झाले. पूर्वी त्यांना भेटण्याची संधी मला मिळाली होती, हे माझं भाग्य आहे. ते एक उत्तम व्यक्ती होते. या कठीण क्षणात मी त्यांच्या परिवारासाठी संवेदना व्यक्त करतो, असे अक्षयने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
-
Saddened to hear about the demise of hockey legend #BalbirSingh ji. Have had the good fortune of meeting him in the past, such an amazing personality! My heartfelt condolences to his family 🙏🏻 pic.twitter.com/knjOq7VEav
— Akshay Kumar (@akshaykumar) May 25, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Saddened to hear about the demise of hockey legend #BalbirSingh ji. Have had the good fortune of meeting him in the past, such an amazing personality! My heartfelt condolences to his family 🙏🏻 pic.twitter.com/knjOq7VEav
— Akshay Kumar (@akshaykumar) May 25, 2020Saddened to hear about the demise of hockey legend #BalbirSingh ji. Have had the good fortune of meeting him in the past, such an amazing personality! My heartfelt condolences to his family 🙏🏻 pic.twitter.com/knjOq7VEav
— Akshay Kumar (@akshaykumar) May 25, 2020
बलबीर सिंग गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते. 12 मे रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आज सकाळी त्यांची प्राणज्योत मावळली. बलबीर यांनी लंडन ऑलिम्पिक १९४८, हेलसिंकी ऑलिम्पिक १९५२ आणि मेलबर्न ऑलिम्पिक १९५६ या स्पर्धेत भारताला सुवर्णपदक जिंकून दिले होते. १९७५ साली हॉकी वर्ल्ड कप जिंकणाऱ्या संघाचे ते व्यवस्थापक होते.