मुंबई - बॉलिवूडचा 'खिलाडी' अक्षय कुमार सध्या अनेक कारणांमुळे माध्यमांच्या मथळ्यात झळकत आहे. मात्र, दरवेळी तो समाजाच्या हितासाठी नेहमी सक्रीय असल्याचे पाहायला मिळते. अलिकडेच ओडीसा येथे 'फनी' चक्रिवादळाचे संकट ओढवले होते. त्यामुळे अनेक नागरिकांचे आणि राज्याचेही नुकसान झाले आहे. त्यांच्या मदतीसाठी अनेकजण समोर आले आहेत. अक्षयनेही त्यांच्या मदतीसाठी १ कोटीची मदत दिली आहे.
एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, अक्षय कुमारने ओडीशातील चक्रिवादळग्रस्तांसाठी १ कोटीची मदत केली आहे. हे पहिल्यांदाच नाही, तर यापूर्वीही त्याने सैन्यदलासाठी 'भारत के वीर' या खात्यात केरळ आणि चैन्नई येथे पुरग्रस्तांसाठी आर्थिक मदत केली होती. अक्षय कुमारने मात्र त्याने केलेल्या मदतीचा कुठेही उल्लेख केला नाही.
'फनी' चक्रिवादळामुळे ओडीशाचे मोठे नुकसान झाले आहे. केंद्र सरकारने देखील १००० कोटीची मदत राज्याला दिली आहे. अलिकडेच पंतप्रधान मोदी यांनी ओडीशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची भेट घेतली.