ETV Bharat / sitara

स्कोर ट्रेंड्स इंडिया चार्टवर अक्षय कुमारचा 'मिशन ऑगस्ट' यशस्वी - Akshay Kumar become Top on Score trandes India Chart with Mission Mangal

स्कोर ट्रेंड्स इंडिया चार्टवर अक्षय कुमार टॉपचा अभिनेता ठरला आहे. त्याच्या अलिकडे रिलीज झालेल्या 'मिशन मंगल' चित्रपटाने त्याला लोकप्रियतेच्या कळसावर पोहोचवलेले आहे.

अक्षय कुमार
author img

By

Published : Sep 25, 2019, 7:13 PM IST

2019 च्या संपूर्ण ऑगस्ट महिन्यात स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्ट्सवर लोकप्रियतेमध्ये बॉलीवूड सुपरस्टार अक्षयकुमार अग्रेसर राहिलेला दिसून आला आहे. मिशन मंगल चित्रपटाच्या यशामूळे खिलाडी कुमार बराच कालावधी नंबर वन स्थानावर राहिलेला दिसून आला आहे. अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया या मीडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट दिली आहे.

या आकडेवारीनुसार, डिजिटल न्युज (सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि वेबसाईट), व्हायरल न्युज आणि प्रिंटन्यूजवर ऑगस्टच्या चारही आठवड्यात 100 गुणांसह अक्षय कुमार पहिल्या क्रमांकावर असलेला दिसून आलाय, 29 ऑगस्टनंतर अक्षयच्या रॅंकिंगमध्ये थोडा फरक पडून तो तिसऱ्या स्थानावर पोहोचला. परंतू ऑगस्ट महिन्यातल्या संपूर्ण आकडीवारीवर नजर टाकल्यास दिसून येईल, की अक्षयने सलमान, शाहरुख, रणवीर आणि वरुणला मागे सोडत ऑगस्ट 2019च्या संपूर्ण महिन्यावरच राज्य केलं आहे.

स्कोर ट्रेंड्स इंडियाचे सह-संस्थापक अश्वनी कौल म्हणतात, "अक्षयच्या डिजिटल प्लॅटफॉर्म आणि पोर्टल्सवर असलेल्या लोकप्रियतेमूळे आणि मिशन मंगलच्या बॉक्स ऑफिसवरच्या धमाकेदार यशामूळे अक्षयच्या लोकप्रियतेत कमालीचा फरक पडला. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि व्हायरल न्यूजमध्ये अक्षयकुमार अग्रेसर स्थानावर राहिला."

अश्वनी कौल पूढे सांगतात, "आम्ही 14 भारतीय भाषांमधील 600 हून अधिक बातम्यांच्या स्त्रोतातून डेटा गोळा करतो. यामध्ये फेसबुक, ट्विटर, मुद्रित प्रकाशने, सोशल मीडियावरील व्हायरल न्यूज, ब्रॉडकास्ट आणि डिजिटल प्लॅटफॉर्म यांचा समावेश आहे. विविध अत्याधुनिक अल्गोरिदममूळे आम्हाला या प्रचंड प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करण्यास मदत होते. आम्ही बॉलीवूड सेलिब्रिटींच्या स्कोर आणि रँकिंगपर्यंत पोहोचू शकतो.”

Intro:Body:

ent. marathi

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.