ETV Bharat / sitara

तमिळ अ‌ॅक्शन थ्रिलर 'कायथी'च्या रिमेकमध्ये बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्याची वर्णी - अजय देवगन न्यूज

लवकरच तमिळ अ‌ॅक्शन थ्रिलर चित्रपट 'कायथी'चाही हिंदी रिमेक तयार होणार आहे. या चित्रपटात कोणत्याही मुख्य अभिनेत्रीची भूमिका नसणार आहे. तसेच, कोणत्या गाण्याचाही यामध्ये समावेश राहणार नाही. फक्त अ‌ॅक्शनने भरलेला हा चित्रपट असल्याचे निर्मात्यांनी सांगितले आहे.

Tamil action-thriller Kaithi remake, Ajay Devgn in Kaithi Hindi remake, Ajay Devgn latest news, Ajay Devgn, तमिळ अ‌ॅक्शन थ्रिलर 'कायथी', कायथी'च्या रिमेकमध्ये अजय देवगची भूमिका, अजय देवगनचे आगामी चित्रपट, अजय देवगन न्यूज, Ajay Devgn news
तमिळ अ‌ॅक्शन थ्रिलर 'कायथी'च्या रिमेकमध्ये बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्याची वर्णी
author img

By

Published : Feb 28, 2020, 12:00 PM IST

मुंबई - बॉलिवूडमध्ये आजवर बऱ्याच दाक्षिणात्य चित्रपटांचे हिंदी रिमेक करण्यात आले आहेत. यापैकी काही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर दमदार यश मिळवले आहे. लवकरच तमिळ अ‌ॅक्शन थ्रिलर चित्रपट 'कायथी'चाही हिंदी रिमेक तयार होणार आहे. या चित्रपटात बॉलिवूडचा सिंघम अजय देवगनची मुख्य भूमिका पाहायला मिळणार आहे.

अजय देवगनने आपल्या ट्विटर हँडलवरुन याबाबत माहिती दिली आहे. १२ फेब्रुवारी २०२१ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. रिलायन्स एंटरटेन्मेंट द्वारे या चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे. तर, लोकेश कनागराज हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे.

हेही वाचा -दिशा पाटणीचा आत्तापर्यंतचा सर्वात बोल्ड आणि ग्लॅमरस डान्स, पाहा 'बागी ३'चं गाणं

या चित्रपटात कोणत्याही मुख्य अभिनेत्रीची भूमिका नसणार आहे. तसेच, कोणत्या गाण्याचाही यामध्ये समावेश राहणार नाही. फक्त अ‌ॅक्शनने भरलेला हा चित्रपट असल्याचे निर्मात्यांनी सांगितले आहे.

या चित्रपटाशिवाय अजय देवगन एसएस राजामौलींच्या 'आरआरआर'(RRR) या चित्रपटातही झळकणार आहे. तसेच रोहित शेट्टीच्या आगामी 'सूर्यवंशी' चित्रपटातही अक्षय कुमारसोबत तो सिंघमच्या भूमिकेत दिसणार आहे. सध्या चाहत्यांना या चित्रपटाची आतुरता आहे.

हेही वाचा -बॉलिवूडचा 'हा' अभिनेता आहे बिग बींचा 'फेवरेट', शेअर केला जुना फोटो

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.