मुंबई - बाहुबली सिरीजला मिळालेल्या भरघोस यशानंतर राजामौलींच्या आगामी सिनेमाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. आता आरआरआर (RRR) या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. ‘आरआरआर’ची घोषणा झाल्यापासूनचं या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळाली. दक्षिणात्य अभिनेता रामचरण आणि ज्यूनियर एनटीआर यांची या चित्रपटात प्रमुख भूमिका आहे. आता अभिनेता अजय देवगनची देखील या चित्रपटात एन्ट्री झाली आहे.
अजय देवगन सध्या त्याच्या 'तान्हाजी - द अनसंग वॉरिअर' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत आहे. लवकरच हा चित्रपट २०० कोटी पार करण्याची शक्यता आहे. आता त्याने ‘आरआरआर’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे.
-
#AjayDevgn begins filming for SS Rajamouli’s ambitious venture #RRR today... Stars #JrNTR, #RamCharan and #AliaBhatt. #RRRMovie pic.twitter.com/7NiMrvRt2b
— taran adarsh (@taran_adarsh) January 21, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#AjayDevgn begins filming for SS Rajamouli’s ambitious venture #RRR today... Stars #JrNTR, #RamCharan and #AliaBhatt. #RRRMovie pic.twitter.com/7NiMrvRt2b
— taran adarsh (@taran_adarsh) January 21, 2020#AjayDevgn begins filming for SS Rajamouli’s ambitious venture #RRR today... Stars #JrNTR, #RamCharan and #AliaBhatt. #RRRMovie pic.twitter.com/7NiMrvRt2b
— taran adarsh (@taran_adarsh) January 21, 2020
हेही वाचा -अमिताभ बच्चन यांच्या 'झुंड' चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित
'आरआरआर' या चित्रपटात अभिनेत्री आलिया भट्टचीही मुख्य भूमिका आहे. तिचा हा पहिलाच दाक्षिणात्य चित्रपट आहे. या चित्रपटाची कथा काल्पनिक असून 1920 मधील स्वातंत्र्यसैनिक अल्लूरी सीताराम राजू आणि कोमाराम भीम या दोन पात्रांभोवती असणार आहे. राजामौली ‘आरआरआर’ चित्रपट बाहुबलीपेक्षा मोठ्या स्केलवर करण्याच्या तयारीत आहेत.
हेही वाचा -'भूल भुलैय्या २'मध्ये दिसणार अक्षय कुमारच्या चित्रपटातील २ गाणी
३० जुलै २०२० रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं बजेट जवळपास ३०० कोटीचं असल्याचं सांगण्यात येत आहे. हिंदी, तामिळ, तेलुगू, मल्ल्याळम आणि अन्य काही भाषांमध्येही हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे