ETV Bharat / sitara

सलग १८ व्या वर्षी 'कान्स'मध्ये सहभागी होणार ऐश्वर्या राय, चाहत्याना लागली तिच्या लूकची आतुरता - cannes film festval

ऐश्वर्याचे हे 'कान्स'मध्ये सहभागी होण्याचे सलग १८ वे वर्ष आहे. २००२ साली तिने पहिल्यांदा 'कान्स'मध्ये सहभाग घेतला होता.

सलग १८ व्या वर्षी 'कान्स'मध्ये सहभागी होणार ऐश्वर्या राय, चाहत्याना लागली तिच्या लूकची आतुरता
author img

By

Published : May 19, 2019, 7:59 PM IST

मुंबई - बॉलिवूडची सौंदर्यवती ऐश्वर्या राय पुन्हा एकदा आपल्या सौंदर्याची भूरळ पाडण्यासाठी 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये सहभागी झाली आहे. फ्रान्सच्या 'फ्रेन्च रिवेरा' मध्ये 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'चा ७२ वा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. आत्तापर्यंत या 'कान्स'मध्ये दीपिका पदुकोण, कंगना रनौत, हीना खान, प्रियांका चोप्रा यांच्या लूकने चाहत्यांचे लक्ष वेधले. आता चाहत्यांना ऐश्वर्याच्या लूकची आतुरता आहे.

ऐश्वर्याने मागच्यावेळी आराध्यासोबत 'कान्स' मध्ये सहभाग घेतला होता. तिने मागच्या वर्षीच्या फेस्टिव्हलमधला एक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यावेळीही ती आराध्यासोबत रेड कार्पेटवर रॅम्पवॉक करताना दिसणार आहे. आराध्यासोबतचा एक फोटो शेअर करून 'कान्स'साठी सज्ज झाल्याचे तिने कॅप्शन दिले आहे. ऐश्वर्याचे हे 'कान्स'मध्ये सहभागी होण्याचे सलग १८ वे वर्ष आहे. २००२ साली तिने पहिल्यांदा 'कान्स'मध्ये सहभाग घेतला होता.

Aishwarya rai
ऐश्वर्याने शेअर केलेला फोटो

ऐश्वर्याच्या लूकची आतुरता असलेले चाहते तिच्या या पोस्टवर भरभरुन प्रतिक्रिया देत आहेत. 'कान्स'ची क्विन असेही तिला संबोधले जात आहे. त्यामुळे यावर्षी तिची कोणती स्टाईल पाहायला मिळणार याची उत्सुकता चाहत्यांना आहे.

Intro:Body:

ENT 05

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.