हैदराबाद - साऊथ अभिनेता विक्रम आणि ऐश्वर्या राय बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेला 'पोनियान सेलवन-1' ची रिलीज डेट समोर आली आहे. प्रसिद्ध दाक्षिणात्य चित्रपट दिग्दर्शक मणिरत्नम यांचा 'पोनियान सेलवन-1' हा चित्रपट यावर्षी प्रदर्शित होत आहे. निर्मात्यांनी चित्रपटातील सर्व मुख्य कलाकारांचे लूक उघड करून रिलीजची तारीख जाहीर केली आहे. या चित्रपटातून अभिनेता विक्रम, जयम रवी, कार्ती आणि शोभिता धुलिपाला यांचा लूक समोर आला आहे. या सर्वांचे लूक चाहत्यांना आवडत आहेत. ऐश्वर्या आणि शोभितच्या लूकची खूप प्रशंसा होत आहे.
दोन भागात 'पोन्नियान सेल्वन-१' बनवण्याची योजना आहे. हा चित्रपट कल्कीच्या क्लासिक तामिळ कादंबरीवर आधारित आहे. कल्कीने ही कादंबरी 1995 मध्ये लिहिली होती. लायका प्रॉडक्शन आणि मद्रास टॉकीज यांनी संयुक्तपणे या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
हा चित्रपट या वर्षी 30 सप्टेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. चित्रपटातील सर्व प्रमुख पात्रांचा फर्स्ट लूक पाहिल्यानंतर चाहत्यांमध्ये चित्रपट पाहण्यासाठी उत्सुकता वाढली आहे.
'पोनियान सेल्वन-1' ची कथा 10व्या शतकातील चोल साम्राज्यातून घेण्यात आली आहे. चित्रपटाचे बजेट 500 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. चित्रपटातील ऐश्वर्या रायच्या पात्राचे नाव नंदिनी आहे.
'पोनियान सेल्वन' हा एक पॅन इंडिया चित्रपट आहे, जो तमिळ, हिंदी, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. देशातील अनेक राज्यांतील सुंदर शहरांमध्ये चित्रपटाचे शूटिंग झाले असून त्यासाठी मोठे सेटही तयार करण्यात आले होते.
हेही वाचा - श्रद्धा कपूरचा ३५वा वाढदिवस: पाहा श्रद्धाच्या बालपणीचे न पाहिलेले फोटो