ETV Bharat / sitara

किशोर कुमारांची भूमिका साकारणार अदनान सामी ?

author img

By

Published : May 24, 2019, 8:17 PM IST

किशोर कुमार यांचा जीवनपट मोठ्या पडद्यावर येणार आहे. यातील मुख्य भूमिकेसाठी अदनान सामी यांचा विचार झाल्याचे सांगितले जाते. लवकरच या सिनेमाची अधिकृत घोषणा होईल.

किशोर कुमार यांचा जीवनपट मोठ्या पडद्यावर येणार

मुंबई - आवाजाचा जादुगार किशोर कुमार यांच्यावर चरित्रपट बनवण्याची तयारी खूप दिवसापासून सुरू आहे. अनुराग बसू याचे दिग्दर्शन करणार होता आणि किशोरदांची भूमिका रणबीर कपूर करणार अशी चर्चा होती. मात्र आता हा सिनेमा दुसऱ्याच दिग्दर्शकासोबत होणार असल्याची चर्चा असून यात किशोर कुमार यांची भूमिका प्रसिध्द गायक अदनान सामी साकारणार आहे.

किशोर कुमार यांच्या व्यक्तीरेखेसाठी अदनान सामी हे योग्य कलाकार असल्याचे सांगितले जाते. त्याला अभिनयाचीदेखील उत्तम जाण आहे. तो एक चतुरस्त्र गायक असून आपल्या भारदस्त आवाजाने लोकांना त्याने भुरळ घातली आहे. या चित्रपटात किशोर कुमार यांची काही अजरामर गाणी रिक्रिएट करण्यात येणार आहेत. ही गाणी अदनान याच्या आवाजात असतील.

अलिकडेच एका गाण्याच्या शोमध्ये अदनान सामी यांनी किशोर कुमार यांच्या काही क्लासिक गाण्याचे रिक्रिएशन केले होते. त्यामुळे किशोर कुमारांच्या बायोपिकसाठी अदनान सामीची निवड योग्य ठरु शकते असा विश्वास निर्मात्यांना वाटतो. लवकरच याची अधिकृत घोषणा होईल.

Intro:Body:

Ent o1

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.