मुंबई - बॉलिवूडची हॉट आणि ग्लॅमरस अभिनेत्री दिशा पाटणी आणि अभिनेता आदित्य रॉय कपूर यांची जोडी आगामी 'मलंग' चित्रपटात एकत्र झळकणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा दमदार ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरवर सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळाला आहे. सध्या दिशा आणि आदित्य या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. दरम्यान दोघांचाही स्टायलिश अंदाज पाहायला मिळत आहे.
'मलंग' चित्रपटात आदित्य आणि दिशाची सिझलिंग केमेस्ट्री पाहायला मिळणार आहे. मलंगच्या ट्रेलर आणि गाण्यांमध्ये त्यांची झलकही दिसून आली. प्रमोशन दरम्यानही त्यांची हिच केमेस्ट्री पाहायला मिळते. तसेच, स्टायलिश अवतारात दोघेही सध्या प्रमोशन करत आहेत.
हेही वाचा -Public Review: कंगनाने घेतला 'पंगा', प्रेक्षकांची जिंकली मने
आदित्यने या चित्रपटासाठी त्याच्या फिटनेसवर चांगलीच मेहनत घेतल्याचे दिसून येते. तर, दिशा नेहमीप्रमाणेच आपल्या ग्लॅमरस अवतारात प्रेक्षकांची मने जिंकते.
मोहीत सुरीने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. अनिल कपूर आणि कुणाल खेमू यांच्याही महत्वपूर्ण भूमिका यामध्ये आहेत. ७ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा -तमिळ आणि तेलुगूमध्येही प्रदर्शित होणार '८३', कमल हासन - नागार्जुन घेणार पुढाकार