ETV Bharat / sitara

HBD : डॉक्टरच्या प्रेमात पडल्या होत्या वैजयंती माला, लग्नानंतर सोडली चित्रपटसृष्टी

हिंदी सिनेाच्या सुवर्ण युगातील लोकप्रिय अभिनेत्री वैजयंती माला यांचा आज 13 ऑगस्ट रोजी जन्म दिवस आहे. शास्त्रीय नृत्यात पारंगत असलेल्या आणि दोन दशके प्रेक्षकांच्या मनावर राज्य गाजवलेल्या या अभिनेत्रीला 'ट्विंकल टोज' या नावानेही ओळखले जाते.

Actress Vaijayanti Mala's 85th Birthday
वैजयंती माला वाढदिवस
author img

By

Published : Aug 13, 2021, 7:30 PM IST

हैदराबाद - दाक्षिणात्य अभिनेत्रीने हिंदी सिनेमाचा पडदा गाजवला त्या होत्या वैजयंती माला. 13 ऑगस्ट 1936 रोजी तामिळनाडूमध्ये जन्मलेल्या वैजयंतीमाला यांनी वयाच्या 13 व्या वर्षी तमिळ चित्रपटातून आपल्या सिने कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी आपल्या बॉलिवूडमध्ये कारकिर्दीची सुरुवात 1951 मध्ये रिलीज झालेल्या 'बहार' चित्रपटातून केली. 1954 साली रिलीज झालेला 'नागिन' हा चित्रपट वैजयंतीमाला यांच्या सिने कारकिर्दीतील पहिला सुपरहिट चित्रपट ठरला.

1955 मध्ये रिलीज झालेला 'देवदास' हा चित्रपट वैजयंती मालाच्या सिने कारकिर्दीतील महत्त्वाच्या चित्रपटांमध्ये गणला जातो. विमल राय दिग्दर्शित व शरदचंद्र चट्टोपाध्याय यांच्या कादंबरीवर आधारित या चित्रपटात वैजयंती माला यांनी रुपेरी पडद्यावर चंद्रमुखीचे पात्र साकारले. या चित्रपटातील त्यांच्या दमदार अभिनयासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

1958 मध्ये रिलीज झालेला 'साधना' हा चित्रपट वैजयंती मालांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा चित्रपट होता. वैजयंती माला यांना बी.आर. चोप्रा निर्मित दिग्दर्शित 'साधना' चित्रपटासाठी त्यांच्या कारकिर्दीत प्रथमच सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

1958 सालीच प्रदर्शित झालेला 'मधुमती' हा चित्रपट वैजयंतीमालाच्या कारकिर्दीतील आणखी एक उल्लेखनीय चित्रपट ठरला. विमल राय निर्मित, हा चित्रपट 'पुनर्जन्म' विषयावर आधारित होता. वैजयंती माला यांनी या चित्रपटात तिहेरी भूमिका करून प्रेक्षकांना रोमांचित केले. या चित्रपटातील त्यांच्या दमदार अभिनयासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले.

1964 साली प्रदर्शित झालेला 'संगम' हा चित्रपट वैजयंतीमालाच्या कारकिर्दीतील सर्वात सुपरहिट चित्रपट ठरला. राज कपूर दिग्दर्शित, संगम हा प्रेम त्रिकोणावर आधारित होता. या चित्रपटात वैजयंती माला, राज कपूर आणि राजेंद्र कुमार यांच्या जोडीचे कौतुक झाले. वैजयंती माला यांना चित्रपटातील दमदार अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला.

वैजयंती माला यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम केले. यामध्ये दिलीप कुमार, राज कपूर, देवानंद, राजेंद्र कुमार आणि सुनील दत्त इत्यादींचा समावेश आहे. आजारी असताना उपचार करणाऱ्वैया डॉक्टरच्या प्रेमात पडल्या होत्या वैजयंती माला. अखेर त्याच डॉक्टरांच्यासोबत वैजयंती माला यांनी 1968 साली लग्न केले आणि त्यानंतर चित्रपटांमध्ये काम करणे बंद केले. त्यांचा शेवटचा 'प्रिन्स' हा चित्रपट 1969 मध्ये प्रदर्शित झाला.

हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त, वैजयंतीमाला यांनी त्यांच्या कारकिर्दीत तेलुगू, तमिळ आणि बंगाली चित्रपटांमध्येही काम केले. वैजयंती माला यांचे उल्लेखनीय योगदान पाहता त्यांना पद्मश्री पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले. चित्रपटांमध्ये अनेक भूमिका साकारल्यानंतर वैजयंती माला समाजसेवेसाठी राजकारणात उतरल्या आणि लोकसभेच्या सदस्य झाल्या. वैजयंती माला आजकाल चित्रपटसृष्टीत सक्रिय नाहीत.

हेही वाचा - देशा प्रेमाने भारलेला ‘भुज द प्राइज ऑफ इंडिया’ अखेर झाला रिलीज

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.