ETV Bharat / sitara

अभिनेता उपेंद्र लिमयेने हार्मोनियमवर धरला गाण्याचा सूर - अभिनेता उपेंद्र लिमये लेटेस्ट न्यूज

चोखंदळ भूमिकेसाठी ओळखला जाणारा उपेंद्र एका गायक-संगीतकाराच्या भूमिकेत पहायला मिळणार आहे. उपेंद्र एक वेगळी भूमिका ‘प्रीतम’ या आगामी चित्रपटातून साकारणार आहे. त्यासाठी त्याने हार्मोनियमवर आलाप आणि ताना घेत गाण्याचा सूर धरला आहे.

Upendra Limaye
उपेंद्र लिमये
author img

By

Published : Feb 5, 2021, 12:16 PM IST

मुंबई - अभिनेता उपेंद्र लिमये हा आपल्या उत्कट अभिनयासाठी प्रसिद्ध आहे. त्याने अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळविलेला आहे. विविध चित्रपटांतून आपल्या धारदार आवाजाच्या आणि अभिनय कौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर स्वत:ची वेगळी छाप उमटवली आहे. नुकतेच त्याने समाज माध्यमावर काही फोटो पोस्ट केले आहेत. त्यामुळे तो सध्या चर्चेत आहे.

फोटोंमध्ये उपेंद्रच्या गळ्यात हार्मोनियम असून तो ते वाजवतो आहे. हे फोटो बघून अनेकांनी शंका उपस्थित केली, ती म्हणजे अभिनेता उपेंद्र लिमये संगीतकार वगैरे झालाय की काय? याचे उत्तर हो आणि नाही असे दोन्ही आहे. चोखंदळ भूमिकेसाठी ओळखला जाणारा उपेंद्र एका गायक-संगीतकाराच्या भूमिकेत पहायला मिळणार आहे. उपेंद्र एक वेगळी भूमिका ‘प्रीतम’ या आगामी चित्रपटातून साकारणार आहे. त्यासाठीच त्याने हार्मोनियमवर आलाप आणि ताना घेत गाण्याचा सूर धरला आहे.

प्रितम चित्रपटातील ‘पावलो म्हसोबा रे’ ‘धावलो पिसोबा रे’ या गाण्यातून कोकणातील संस्कृतीचे दर्शन घडवतानाच प्रेमाचा व आपुलकीचा रंगही जाणवतो. ‘प्रीतम’ चित्रपटातील हे भन्नाट गाण अभिनेता उपेंद्र लिमये व प्रणव रावराणे यांच्यावर चित्रित झाले आहे. ‘प्रीतम’ चित्रपटाची दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे 'ॲड फिल्म मेकर' सिजो रॉकी यांनी. या चित्रपटाची गीते गुरु ठाकूर यांनी लिहिली आहेत. पार्श्वसंगीत विजय गावंडे यांचे असून शंकर महादेवन, अभय जोधापूरकर, मनिष राजगिरे यांचा स्वरसाज चित्रपटातील गाण्यांना लाभला आहे. चित्रपटाची निर्मिती फैजल नितीन सिजो यांनी केली आहे.

उपेंद्र लिमये, यांच्यासोबत प्रणव रावराणे आणि नक्षत्रा मेढेकर ही फ्रेश जोडी ‘प्रीतम’मध्ये पहायला मिळणार आहे. अजित देवळे, विश्वजीत पालव, समीर खांडेकर, आभा वेलणकर, शिवराज वाळवेकर, अस्मिता खटखटे, नयन जाधव, आनंदा कारेकर या कलाकारांच्या चित्रपटात भूमिका आहेत. ‘प्रीतम’ येत्या १९ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.