ETV Bharat / sitara

'मन उधाण वारा'द्वारे ज्येष्ठ अभिनेते सतिश कौशिक यांची मराठी सिनेनिर्मितीत एंट्री - शर्वरी लोहकरे

'मन उधाण वारा' या चित्रपटाच्या निर्मितीसाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर संजय मेमाणे यांनी सांभाळली आहे.

'मन उधाण वारा'द्वारे ज्येष्ठ अभिनेते सतिश कौशिक यांची मराठी सिनेनिर्मितीत एंट्री
author img

By

Published : Aug 23, 2019, 8:12 AM IST

मुंबई - ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक हे हिंदी चित्रपटसृष्टीतलं नावाजलेलं नाव. आजवर आपल्या वैविध्यपूर्ण भूमिका आणि दिग्दर्शनाद्वारे त्यांनी वारंवार आपलं वेगळेपण सिद्ध केलं आहे. रंगमंच, छोटा पडदा आणि हिंदी चित्रपटसृष्टी गाजवल्यानंतर आता सतीश कौशिक मराठी चित्रपटसृष्टीत निर्माते म्हणून पदार्पण करत आहेत.

'मन उधाण वारा' या चित्रपटाच्या निर्मितीसाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर संजय मेमाणे यांनी सांभाळली आहे. 'द सतीश कौशिक एंटरटेनमेंट प्रोडक्शन्स' आणि 'लोका एंटरटेनमेंट' यांच्या संयुक्त विद्यमाने या सिनेमाची निर्मिती होत असून, ‘पेन मुव्हीज्’चे जयंतीलाल गडा हे हा सिनेमा प्रस्तुत करणार आहेत.

कोकणच्या निसर्गरम्य पार्श्वभूमीवर अतिशय तरल आणि सुंदर प्रेमकथा या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या समोर येणार आहे. या चित्रपट निर्मितीबद्दल बोलताना सतीश कौशिक सांगतात, की ‘संहिता आणि आशय या दोन्ही गोष्टी मराठी चित्रपटाच्या बलस्थान राहिल्या आहेत. एक वेगळा दृष्टीकोन देणाऱ्या या मराठी चित्रपटाची निर्मिती आपण करावी असं मला वाटलं, त्यातूनच ‘मन उधाण वारा’ ही हळवी प्रेमकथा मराठी रसिकांसाठी आणायचं निश्चित केल्याचं त्यांनी सांगितलं. ही प्रेमकथा असली तरी आयुष्याचे वेगवेगळे पदर यातून अनुभवायला मिळणार आहेत.

Satish Koushik
सतिश कौशिक

किशोर कदम, उत्तरा बावकर, सागर कारंडे, शर्वरी लोहकरे, मोनल गज्जर, रित्विज वैद्य, डॉ. शरद भुताडिया, विनोद कुलकर्णी, भारती पाटील, वैभव राजाध्यक्ष, साक्षी गांधी, ज्युलिया मोने, अनुराधा अटलेकर या कलाकारांच्या यात भूमिका आहेत. तर चित्रपटाची कथा प्रदीप कुरबा यांची असून पटकथा-संवाद सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांनी लिहिले आहेत. छायांकन मिलिंद जोग तर संकलन कृष्णत घार्गे यांचे आहे. ११ ऑक्टोबर रोजी हा सिनेमा रिलीज करण्याचा निर्मात्यांचा मानस आहे.

Intro: ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक हे हिंदी चित्रपटसृष्टीतलं नावाजलेलं नाव. आजवर आपल्या वैविध्यपूर्ण भूमिका आणि दिग्दर्शनाद्वारे त्यांनी वारंवार आपलं वेगळेपण सिद्ध केलं आहे. रंगमंच, छोटा पडदा आणि हिंदी चित्रपटसृष्टी गाजवल्यानंतर आता सतीश कौशिक मराठी चित्रपटसृष्टीत निर्माते म्हणून पदार्पण करतायत. ‘मन उधाण वारा’ या चित्रपटाच्या निर्मितीसाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर संजय मेमाणे यांनी सांभाळली आहे. ‘द सतीश कौशिक एंटरटेनमेंट प्रोडक्शन्स’ आणि ‘लोका एंटरटेनमेंट’ यांच्या संयुक्त विद्यमाने या सिनेमाची निर्मिती होत असून, ‘पेन मुव्हीज्’चे जयंतीलाल गडा हे हा सिनेमा प्रस्तुत करणार आहेत.

कोकणच्या निसर्गरम्य पार्श्वभूमीवर अतिशय तरल आणि सुंदर प्रेमकथा या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या समोर येणार आहे. या चित्रपट निर्मितीबद्दल बोलताना सतीश कौशिक सांगतात की, ‘संहिता आणि आशय या दोन्ही गोष्टी मराठी चित्रपटाच्या बलस्थान राहिल्या आहेत. एक वेगळा दृष्टीकोन देणाऱ्या या मराठी चित्रपटाची निर्मिती आपण करावी असं मला वाटलं, त्यातूनच ‘मन उधाण वारा’ ही हळवी प्रेमकथा मराठी रसिकांसाठी आणायचं निश्चित केल्याचं त्यांनी सांगितलं. ही प्रेमकथा असली तरी आयुष्याचे वेगवेगळे पदर यातून अनुभवायला मिळणार आहेत.

किशोर कदम, उत्तरा बावकर, सागर कारंडे, शर्वरी लोहकरे, मोनल गज्जर, रित्विज वैद्य, डॉ.शरद भुताडिया, विनोद कुलकर्णी, भारती पाटील, वैभव राजाध्यक्ष, साक्षी गांधी, ज्युलिया मोने, अनुराधा अटलेकर या कलाकारांच्या यात भूमिका आहेत. तर चित्रपटाची कथा प्रदीप कुरबा यांची असून पटकथा-संवाद सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांनी लिहिले आहेत. छायांकन मिलिंद जोग तर संकलन कृष्णत घार्गे यांचे आहे. ११ ऑक्टोबर रोजी हा सिनेमा रिलीज करण्याचा निर्मात्यांचा मानस आहे.

Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.