मुंबई - ‘ब्रिथ इनटू द शॅडोज’ ही वेबसीरिज प्रदर्शनासाठी सज्ज झाली आहे. यातून अभिषेक बच्चन वेबसीरिजच्या विश्वात पदार्पण करत आहे. येत्या 10 जुलैला सीरिज अमेझॉन प्राईमवर प्रदर्शित केली जाणार आहे. ही एक क्राईम थ्रिलर सीरिज असणार आहे.
अब्यूनदांतिया इंटरटेनमेंट यांनी सीरिजची निर्मिती केली आहे. यात अभिषेकसोबत दाक्षिणात्य अभिनेत्री नित्या मेनन झळकणार आहे. या सीरिजचा पहिला भाग 2018 मध्ये प्रसारित झाला होता. यात पोलिसाची भूमिका साकारलेले अमित शाध या सीरिजमध्ये कबीर सावंत नावाची भूमिका साकारणार आहेत.
अमेझॉन प्राईम व्हिडिओ इंडिया ओरिजनल्सच्या प्रमुख अपर्णा पुरोहित म्हणाल्या, अभिषेक बच्चन, अमित साध, नित्या मेनन आणि सय्यामी खेर यांच्यासह हा नवा शो प्रेक्षकांच्या भेटीला आणण्यास उत्सुक आहोत. देशातील आणि देशाबाहेरील सर्व प्रेक्षकांना ही सीरिज आवडेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. या सीरिजचे दिग्दर्शन मयंक शर्मा यांनी केलं आहे.