मुंबई - अभिनेत्री सोनम कपूरचा आज वाढदिवस आहे. शनिवारी रात्रीच तिच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन करण्यात आले. तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी तिचे संपूर्ण कुटुंबीय यावेळी उपस्थित होते. तिच्या या खास बर्थडे सेलिब्रेशनचे फोटोदेखील सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. तर, सोनमचे पती आनंद अहुजानेही तिला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.
सोनमच्या बर्थडे पार्टीत अनुपम खेर, मसाबा गुप्ता, पूजा ढिगरा यांचीदेखील विशेष उपस्थिती होती. सोनमसाठी आनंदने सोशल मीडियावर दोघांचाही एक फोटो शेअर करून सोनमला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
सोनमची बहीण रिया कपूर हिनेही सोनमचा एक फोटो शेअर करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
सोनमने 'सांवरीयां' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. काही दिवसांपूर्वीच तिचा 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा', हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. मात्र, या चित्रपटाला पाहिजे तसे यश मिळाले नाही. लवकरच ती जोया 'फॅक्टर' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ती दुलकर सलमान या अभिनेत्यासोबत झळकणार आहे.