मुंबई - मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान सध्या त्याच्या आगामी 'लाल सिंग चढ्ढा'च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. सध्या तामिळनाडू येथे या चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. यावेळी आमिरने पोलीस अधिक्षक वरुण कुमार यांची भेट घेतली. तसेच, तरुणाईला व्यसनांपासून दुर राहण्याचा सल्ला यावेळी दिला.
'लाल सिंग चढ्ढा' या चित्रपटाचं शूटिंग सध्या रामनाथपुरम जिल्ह्यातील रामेश्वरम आणि धनुषकोडी येथे सुरू आहे.
तरुणाईला संदेश देताना आमिर म्हणाला, की 'डिप्सोमानिया किंवा इतर औषधांपासून सावधान राहिले पाहिजे. नशेच्या पदार्थांची सवय लावु नये. तसेच, आपले आयुष्य यांसारख्या पदार्थामुळे खराब करू नये. आपण सर्वांनी आनंदी जीवन जगावे. तसेच, इतरांनाही आनंदी ठेवावे.
हेही वाचा -अक्षयने दिलेले 'ते' अमुल्य झूमके घालून ट्विंकलने शेअर केला फोटो
व्यायामाबद्दलही त्याने यावेळी सल्ला दिला. योग्य आहार आणि योग्य व्यायामामुळे निरोगी राहण्यास मदत होते. जर आपण तंदरुस्त असलो, तर आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊ शकतो, असे तो म्हणाला.
आमिर खान 'लाल सिंग चढ्ढा' चित्रपटामध्ये सरदारच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचा फर्स्ट लूकही प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट १९९४ साली प्रदर्शित झालेल्या 'फॉरेस्ट गंप' या हॉलिवूडपटाचा रिमेक आहे. रॉबर्ट जेमेकिस यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केले होते. तर, विंस्टन ग्रूम यांनी या चित्रपटाची कथा लिहिली होती. टॉम हॅक्स या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसला होता.
हेही वाचा -कंगनाच्या 'पंगा'चं नवं पोस्टर, नीना गुप्तांनी शेअर केला फोटो
आता 'लाल सिंग चढ्ढा' मधून आमिर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होईल.