मुंबई - आपल्या लहानपणीच्या आठवणी सर्वांसाठीचं खास असतात. प्रत्येकाच्या आयुष्यातील सुंदर काळ असणाऱ्या या बालपणाचे फोटो सर्वच अगदी जपून ठेवत असतात. असाच एक बालपणीचा फोटो अभिनेत्री यामी गौतम हिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे.
'विकी डोनर' फेम यामी गौतमने रविवारी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून हा फोटो पोस्ट करत याला खास कॅप्शनही दिले आहे. दात असो किंवा नसो, फक्त हसत रहा, असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे. यासोबतच हा आपल्या पहिल्या वाढदिवसाचा फोटो असल्याचं तिनं सांगितलं आहे.
फोटोत यामीने काळ्या रंगाचा ड्रेस घातला असून तिच्या बाजूला फुगे आहेत. तर तिचं निरागस हास्य प्रेक्षकांची मनं जिंकणारं आहे. कामाविषयी बोलायचे झाल्यास यामी लवकरच 'बाला' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यात ती आयुष्मान खुराणासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.