मुंबई - सुपरस्टार सलमान खानचा राधे: युवर मोस्ट वॉन्टेड भाई हा चित्रपट हायब्रीड रिलीजसाठी सज्ज झाला आहे. ईद निमित्ताने रिलीज होणाऱ्या या चित्रपटाला कोरोनामुळे किती मोठी आर्थिक फटका बसलाय याची जाणीव असल्याचे सलमानने म्हटले आहे.
भारतात अजूनही कोरोनाची साथ आटोक्यात आलेली नसल्यामुळे हा चित्रपट पे- पर -व्ह्यू- रिलीजच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहोचणार आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीतल्या सलमानने अगदी स्पष्टपणे कबूल केले आहे की रिलीजनंतर चित्रपटाने कमाई करण्याच्या बाबतीत त्यांना फारशी आशा नाही.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
"आम्हाला राधेमधून सर्वात कमी कमाई होईल. आम्ही कदाचित १०-१५ कोटी रुपयेही ओलांडू शकणार नाही. ज्यांना कमी कमाई झाल्यामुळे आनंद होणार असेल तो होऊ शकतो. काही लोकांना जास्त कमाई झाल्यामुळे आनंद होतो तर काहींना माझ्या कमी कमाईमुळे. राधेमधून आम्हाला तोटा झाला आहे आणि बॉक्स ऑफिस कमाईदेखील शून्य असेल. तरीही आम्ही राधेचे रिलीज करीत आहोत." असे सलमान म्हणाला.
हा चित्रपट रिलीज करण्याची योग्य वेळ असल्याचेही सलमानने म्हटले आहे. एकदा परिस्थिती चांगली झाली आणि चित्रपटगृहे उघडली की हा चित्रपट पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित करण्याचा विचार सलमान करत आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
प्रभुदेवा दिग्दर्शित हा चित्रपट ईदच्या सणानिमित्य १३ मेपासून ओटीटी आणि डीटीएच सेवांसह अनेक प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. दिशा पाटनी, रणदीप हूडा आणि जॅकी श्रॉफ यांच्या मुख्य भूमिका असलेल्या राधे पे-पर-व्ह्यू ब्रॉडकास्ट झी प्लेक्सवर प्रदर्शित होतील.
हेही वाचा - राजधानी दिल्लीत सर्व सुविधायुक्त १०० खाटांचे रुग्णालय बांधतेय हुमा कुरेशी!