ETV Bharat / sitara

राजीव कपूरना बनायचे होते दिग्दर्शक, योगायोगाने बनले अभिनेता - Rajiv Kapoor wanted to be a director, coincidentally became an actor

शोमॅन राज कपूर यांचा मुलगा राजीव कपूर यांचे वयाच्या ५८ व्या वर्षी मुंबईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. राजीव कुटुंबातील सर्वात धाकटे होते. स्वतःच्या हिंमतीवर पाऊल टाकावे अशी त्यांचे वडील राज कपूर यांची इच्छा होती.

Raj Kapoor
राजीव कपूर
author img

By

Published : Feb 9, 2021, 7:38 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेता आणि चित्रपट निर्माते राजीव कपूर यांनी वयाच्या ५८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. दिवंगत दिग्गज राज कपूर यांच्या तीन मुलांपैकी ते सर्वात धाकटे होते. रणधीर कपूर आणि दिवंगत ऋषी कपूर यांचे ते धाकटे भाऊ होते. राजीव यांच्या कारकीर्दीला यशस्वी बनवण्यासाठी त्यांच्या वडिलांकडे सर्व साधने होते. तरीही आर. के. फिल्म्सच्या बॅनरखाली काम करीत असताना अनेक संघर्षांची चव त्यांनी चाखली.

Rajiv Kapoor with brother Rishi Kapoor
भाऊ ऋषी कपूरसोबत राजीव

राजीव यांनी १९८३ मध्ये एक जान है हम या सिनेमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आणि तीन वर्षांनंतर त्यांची खरी ओळख ब्लॉकबस्टर राम तेरी गंगा मैली या चित्रपटामुळे सर्वांना झाली. हा राज कपूर यांचा शेवटचा दिग्दर्शक म्हणून चित्रपट होता. त्यानंतर राजीव आपला भाऊ ऋषी कपूरसमवेत दिसले होते आणि दोघांनी राजीव यांच्या दिग्दर्शनाखाली प्रेमग्रंथ हा चित्रपटही बनवला होता.

Rajiv Kapoor at Shashi Kapoor's residence for Christmas bash in 2020
ख्रिसमस साजरा करताना राजीव कपूर

आपल्या भावांच्या तुलनेत आपल्याला अधिक संघर्ष करावा लागला काय असे विचारले असता, राजीव म्हणाले होते की ऋषी आणि रणधीर यांच्यासारखे अभिनेता नाही तर नेहमीच त्याला दिग्दर्शक व्हायचे होते. मात्र योगायोगाने तो अभिनेता बनला, कारण तो राज कपूरचा शेवटचा मुलगा होता.

त्यांच्या संघर्षाबद्दल बोलताना राजीव यांनी शेअर केले होते, "अर्थातच मी (राज कपूर) यांच्याबरोबर माझ्या पहिल्या चित्रपटात काम केले नाही. मी एफसी मेहरा आणि त्याचा मुलगा (राजीव मेहरा) सोबत बाहेर काम केले होते. माझ्या वडिलांची मी असे करावे अशी इच्छा होती. वडिलांनी जसे केले तसेच मी करावे असे त्यांना वाटत होते. ते म्हणत असत की, 'तू बाहेर का जात नाहीस? राज कपूर यांनी प्रत्येक गोष्ट ताटात वाढून द्यावी असे तुला का वाटते?'

Raj Kapoor with his sons -- Randhir, Rajiv and Rishi
राज कपूरसोबत रणधीर, राजीव आणि ऋषी कपूर

अभिनेता आणि चित्रपट निर्माते म्हणून जरी त्याची ओळख असली तरी राज कपूरचा मुलगा अशी त्याची मोठी ओळख होती. राजीव म्हणाले होते की, 'आज जर मला ओळखले जात असेल तर राम तेरी गंगा मैली या एकमेव यशस्वी चित्रपटामुळेच.'

त्यांनी हे देखील कबूल केले होते की वडिलांच्या निधनानंतर, त्याचे भाऊ ही त्यांची सर्वात मोठी समर्थन देणारी शक्ती होती. त्यांना हव्या असलेल्या सर्व गोष्टी देण्यास त्यांनी कधीच कसर सोडली नसल्याचे ते सांगत.

तीन भावांमध्ये आणि दोन बहिणींमध्ये राजीव सर्वात लहान होते. त्यांची मोठी बहीण रितु नंदा आणि भाऊ ऋषी यांचे गेल्या वर्षी जानेवारी आणि एप्रिलमध्ये निधन झाले. आज राजीव कपूर यांची प्राणज्योत माळवल्याचे रणधीर कपूर यांनी जाहीर केले.

हेही वाचा - कपूर खानदानातील निखळला अजून एक तारा, चिंटू पाठोपाठ चिंपूनेही घेतला निरोप!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.