मुंबई: सुशांतसिंग राजपूत यांच्या अकाली निधनामुळे जुन्या नेपोटिझ्मच्या चर्चेला उधाण आलं आहे. बॉलिवूडच्या प्रस्थापित कलाकारांना सुशांतच्या चाहत्यांच्या आक्रोशाला सामोरे जावे लागत आहे. कंगना रनौत बॉलिवूडमधील नेपोटिझ्मचा मुद्दा सतत लावून धरत आहे. अलिकडेच जावेद अख्तर यांची मुले फरहान आणि झोया अख्तरने एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती त्यावर कंगनाने कडक प्रतिक्रिया दिली आहे.
ट्विटरवर आघाडीच्या वाहिनीने शेअर केलेल्या 40 सेकंदाच्या प्रोमोमध्ये जावेद अख्तर म्हणताना दिसतात की जगातील प्रत्येक क्षेत्रात नेपोटिझ्म अस्तित्त्वात आहे. ते म्हणाले, "जर माझ्याकडे पैसे असतील तर मी माझ्या मुलावर पैसे ठेवीन, हा नेपोटिझ्म आहे? मग प्रत्येक उद्योग म्हणजे नेपोटिझ्म आहे," असे ते यात म्हणताना दिसतात.
फरहान पुढे म्हणाला, "जर तुम्ही खूप हुशार असाल तर तुमच्या प्रतिभेला मार्ग सापडेल. असे निश्चित होईल. '
झोया म्हणाली, "जर मी केश कर्तनकार आहे आणि माझे दुकान असेल तर मी ते माझ्या मुलाकडे सोपवणार आहे की, मी शहरातील सर्वात उत्तम केस कापणाऱ्याला देणार आहे? आणि ही तळातील ओळ आहे."
हेही वाचा - धमकी देणाऱ्या ट्रोलर्स विरुध्द न्यायालयात जाण्याच्या तयारीत करण जोहर
हा प्रोमो शेअर करीत कंगनाच्या टीमने लिहिले आहे, "प्रिय अख्तर परिवार, मी मनालीच्या अमरदीप रनौत यांची मुलगी कंगना रनौत. तुमच्याकडे कधी काम मागितले? तुमच्याकडे जे आहे ते सगळं मुलांना आनंदाने देऊन टाका." तिने पुढे लिहिलंय, "जगा आणि जगू द्या असे कधी ऐकले आहात का? तुम्ही तुमच्या मुलांवर इतके प्रेम करताय तर दुसऱ्यांच्या मुलींना धमक्या का देता? तुम्ही तिला घरी बोलवून धमकावले होतेत याचे उत्तर द्या. कृपया उत्तर द्या."
कामाच्या पातळीवर कंगना रनौत आगामी थलायवी या चित्रपटात झळकणार आहे. तिच्याकडे तेजस आणि धाकड हे दोन चित्रपटदेखील हातात आहेत.