ETV Bharat / sitara

कॅटरिना कैफने शेअर केला थक्क करणारा आकर्षक व्हिडिओ - कॅटरिना कैफचे आगामी चित्रपट

अभिनेत्री कॅटरिना कैफ तुर्कीमध्ये तिच्या आगामी टायगर 3 चित्रपटाच्या शूटिंगसाठी गेली आहे. इथे ती खरेदी करताना, मजा मस्ती करताना सोशल मीडियावर दिसत असते. मात्र ती तितकीच मेहनत जिममध्येही करताना दिसते. अलिकडे तिने शेअर केलेला व्हिडिओ चाहत्यांची आकर्षण ठरला आहे.

कॅटरिनाचा जिममधील व्हिडिओ
कॅटरिनाचा जिममधील व्हिडिओ
author img

By

Published : Sep 18, 2021, 10:33 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ तुर्कीमध्ये तिच्या आगामी टायगर 3 चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. शुटिंग करत नसताना, कॅटरिना खरेदीमध्ये गुंतलेली असते, इस्तंबूलच्या रस्त्यावर फिरत असते किंवा उद्यानांमध्ये आराम करत असते. तिच्या इन्स्टाग्रामवरील लेटेस्ट पोस्टमधून असे दिसते की ती जिममध्ये मेहनत करण्याचे कधीच टाळत नाही.

शनिवारी कॅटरिनाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात ती जिममध्ये मेहनत करताना दिसत आहे. पार्श्रवभूमीवर डॉन्की रॅटल - किल द बोर हे फेलीक्स लाबँडचे रिमिक्स गाणे मोठ्याने वाजताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना तिने स्पष्ट केलंय की, तिला जिममध्ये जाण्यासाठी पुशची आवश्यकता होती कारण तिचे शरीर तिच्या मनाचे ऐकत नव्हते. कॅरिनाला तिच्या आयुष्यात एक अत्यंत आवश्यक व्यक्तीची गरज होती आणि ती व्यक्ती म्हणजे तिचा कथित प्रियकर विकी कौशल नाही तर सेलेब्रिची फिटनेस ट्रेनर रजा कटानी आहे.

इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करताना कॅटरिनाने लिहिले, "मी माझ्या मनाला असे प्रशिक्षित केले आहे की त्याला माझे शरिर फॉलो करते. पण तसे होत नसेल तर मी रजा कटानीला फोन करते." इन्स्टाग्रामवर कॅटरिना कैफच्या फॉलोअर्सना तिची फिटनेसची आवड आवडली आहे. काही इन्स्टाग्राम युजर्सनी तिला "फिटनेस प्रेरणा" म्हटले आहे तर काहींनी तिच्या "आश्चर्यकारक ताकद" ची प्रशंसा केली आहे.

हेही वाचा - सोनू सूदच्या विरोधात 20 कोटी कर चोरीचे प्रकरण आले समोर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.