ETV Bharat / sitara

समीर शर्माच्या अचानक झालेल्या भेटीने सत्यजीत दुबेला पहिले काम मिळाले होते - समीर शर्माने आत्महत्या केली

मुंबईत नवीन असताना आणि कामाच्या शोधात असताना सत्यजीत दुबेला समीर शर्मा भेटला. त्याने पहिले काम मिळवून देण्यासाठी ओळख नसताना सहकार्य केले. त्यामुळे सत्यजीतचे मुंबईत जगणे सुकर झाले होते. आज समीर शर्मा या जगात नाही. परंतु सत्यजीतसारख्या कलाकारांच्या तो कायम स्मरणात आहे. सत्यजीतने समीरच्या जागवलेल्या आठवणी..

satyajeet-dubey
सत्यजीतने समीरच्या जागवलेल्या आठवणी
author img

By

Published : Aug 8, 2020, 2:50 PM IST

मुंबई - अभिनेता समीर शर्माने काही दिवसापूर्वी आत्महत्या केली होती. टीव्ही मालिकांमधून प्रसिद्दीस आलेला हा अभिनेता चित्रपटसृष्टीतही आपली ओळख निर्माण करीत होता. मात्र त्याने अचानक हे जग सोडण्याचा निर्णय घेतला याचे दुःख या क्षेत्रातील अनेकांना झालंय. अभिनेता सत्यजीत दुबे यानेही समीरच्या आठवणीना उजाळा दिलाय. त्याच्या करियरच्या सुरूवातीच्या काळात समीरशी त्याची भेट झाली होती आणि त्याने त्याला मदतही केली होती. समीरबद्दल मी नेहमीच ऋणी राहीन असे दुबेने म्हटलंय.

  • Then he replied saying ‘there’s a tv production house called SphereOrigins across the road, they’re looking for a young boy like you for a tv show, why don’t you go and test for it?’ I said ‘thank you, i must’ & he said ‘all the best, hope u get it’ n we both went our ways
    Conti.

    — Satyajeet Dubey (@satyajeet_dubey) August 6, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

"मी या पुस्तकाच्या दुकानात एकदा लँडमार्क नावाच्या इन्फिनिटी मॉलमध्ये प्रवेश केला होता, मी 18 वर्षांचा होतो आणि मुंबईत नवा होतो. मी त्याला त्याच्या टीव्हीवरील कामातून ओळखले. तो हसला आणि मी म्हणालो 'हाय सर' त्याने मला विचारले ' तू अभिनेता आहेस? ' मी म्हणालो, 'होय'. मग त्याने उत्तर दिले की, 'रस्त्याच्या कडेला स्फेअरऑरिगिन नावाचे एक टीव्ही प्रॉडक्शन हाऊस आहे, ते तुमच्यासारख्या लहान मुलांना टीव्ही शोसाठी शोधत आहेत, तू जाऊन त्याची ऑडिशन का देत नाही?' मी म्हणालो, ‘धन्यवाद, मी नक्की तसे करेन’ आणि तो म्हणाले, ‘ऑल द बेस्ट, तुला काम मिळेल अशी आशा आहे’ आणि आम्ही दोघे निघून गेलो, ” असे सत्यजीतने सांगितले.

  • Rest in Peace brother 💔 #SameerSharma
    I had bumped into him once at this bookstore that used to be in infinity mall called Landmark, i was 18, new in Mumbai. I recognised him from his television work. He smiled and i said ‘hi Sir’ He asked me ‘r u an actor?’ I said ‘yes’
    Conti.. pic.twitter.com/r3DF7w5zLu

तो पुढे म्हणालेा "मी तातडीने रस्ता ओलांडला, कास्टिंग डायरेक्टरला भेटलो, ऑडिशन केले आणि मला काम मिळाले. हे काम काही मोठे नव्हते, 6 दिवसाचे काम होते आणि मला अठराशे रुपये पगार मिळाला, पण हे माझ्यासाठी खूप मोठे काम होते. त्यामुळे मला मदत झाली. एक महिना तग धरण्यासाठी याचा उपयोग झाला.. समीरचे आभार. "

"तो मला अजिबात ओळखत नव्हता. परंतु तो माझ्याशी खूप सौम्य आणि दयाळू वागला होता आणि त्याने मला एक दिशा दिली. त्यानंतर अनेक वर्षांनी त्याने 'इत्तेफाक' चित्रपटात काम केले, जिथे माझी बहीण सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होती आणि ती त्याच्याबद्दल म्हणाली की, हा अभिनेता अतिशय प्रेमळ आहे. त्या क्षणापर्यंत मला त्याचे नाव देखील माहित नव्हते.''

हेही वाचा - केरळ विमान दुर्घटना : बॉलिवूड स्टार्सनी दु:ख व्यक्त करीत वाहिली श्रद्धांजली

यथावकाश समीरचे नाव सत्यजीतला कळले. त्याने केलेल्या मदतीमुळे त्याला खूप मदत झाली होती. त्याचे आभार मानत त्याने समीरच्या ऋणात राहण्याचे बोलून दाखवत त्याच्या आटवणींना उजाळा दिला आहे. समीर शर्मा याने बुधवारी रात्री मालाड पश्चिम येथील निवासस्थानाच्या स्वयंपाकघरात लटकून आत्महत्या केली होती.

समीरच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त करताना सत्यजीत यांनी लिहिले: “आज जेव्हा मी त्यांच्या निधनाबद्दल वाचले तेव्हा माझ्या आठवणींच्या कोपऱ्यात हरवलेल्या समीरबरोबर झालेल्या छोट्या भेटीच्या सर्व आठवणी, छोटेसे तपशील पुन्हा प्रकट झाले. आपल्या अस्तित्वामुळे माझे आयुष्य अधिक चांगले केल्याबद्दल धन्यवाद. "

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.