ETV Bharat / sitara

चॅट शेअर करून काय सिद्ध करू पाहतेय; अभिनेत्री काम्या पंजाबीनं रियाला सुनावलं - काम्या पंजाबी

रिया चक्रवर्तीने सुशांतसिंह राजपूतसोबतचे व्हॉट्सअ‌ॅप चॅट शेअर केले असून त्या चॅटमध्ये सुशांतने आपल्या बहिणींबाबत नाराजी व्यक्त केली. त्यावरून अभिनेत्री काम्या पंजाबीने रियाला सुनावलं आहे.

काम्या पंजाबी
काम्या पंजाबी
author img

By

Published : Aug 10, 2020, 2:11 PM IST

मुंबई - रिया चक्रवर्तीने सुशांतसिंह राजपूतसोबतचे व्हॉट्सअ‌ॅप चॅट शेअर केले असून त्या चॅटमध्ये सुशांतने आपल्या बहिणींबाबत नाराजी व्यक्त केली. त्यावरून अभिनेत्री काम्या पंजाबीने रियाला सुनावलं आहे. ही चॅट शेअर करून रिया काय सिद्ध करू पाहत आहे, असा सवाल काम्याने केला आहे.

चॅटमधून रिया काय सिद्ध करू पाहत आहे. बहिण-भावामधील भांडणं होणं ही सामान्य गोष्ट आहे. यामध्ये कोणती मोठी गोष्ट नाही. महत्त्वाचं म्हणजे तो आपल्या बहिणीवर नाही, तर तुझ्याबरोबर राहत होता. सर्व क्रेडिट कार्ड तू वापरत होती. त्याच्या बहिणीने नाही, असे काम्याने पोस्टमध्ये म्हटले आहे. याचबरोबर तिने 'चोर की दाढ़ी में तिनका' हा हॅशटॅग वापरला आहे.

दरम्यान, रियाने दोन दिवसांपूर्वी रियानं तिच्या आणि सुशांतच्या व्हॉट्सअ‌ॅप चॅटचे स्क्रिन शॉट्स शेअर केले होते. या चॅटमध्ये सुशांत आपल्या बहिणीबद्दल बोलत असून बहिणीला वाईट म्हटल्याचं पाहायला मिळत आहे, तर रिया सुशांत आणि त्याच्या बहिणीचं भांडण सोडवण्याचा प्रयत्न करतेय, असे चॅटमध्ये दिसत आहे. तसेच सुशांतच्या कुटुंबीयांना त्याच्या विम्याचे पैसे हवे आहेत. त्यामुळं त्यांनी माझ्यावर खोटे आरोप करत खटला दाखल केल्याचा आरोप चौकशीदरम्यान रियाने केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.