नवी दिल्ली - बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंग यांनी विवाहगाठ बांधली आहे. अलीकडेच नेहा कक्कर आणि रोहनप्रित यांनी अचानक लग्न करून आपल्या चाहत्यांना मोठे सरप्राईज दिले. नेहा आणि रोहनप्रित सिंग यांच्या लग्नाचे व्हिडिओ इंटरनेटवरून मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. यातील एका व्हिडिओमध्ये नेहा कक्कर घुंघट घालून 'नाच मेरी लैला' गाण्यावर नाचताना दिसली आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
नेहा कक्कर हिने तिच्या तोंडावर लाल घुंघट घातलेला आहे, त्याचवेळी व्हिडिओमध्ये टोनी कक्कर आणि रोहनप्रित हे दोघेही तिच्यासोबत दिसत आहेत. नेहा आणि रोहनप्रित यांच्या या व्हिडिओवर चाहते खूप कमेंट करत आहेत आणि आपला अभिप्राय देत आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, नेहा आणि रोहनप्रित सिंगच्या लग्नात केवळ कुटुंब आणि खास मित्रच सामील झाले होते. लग्नानंतर दोघंही पंजाबमध्ये रिसेप्शन देणार आहेत. लग्नाआधी नेहा कक्कर हिच्या मेहंदी आणि हळदी समारंभांशी संबंधित व्हिडिओंचीही बरीच चर्चा होती. अलीकडेच नेहा कक्कर आणि रोहनप्रितसिंग यांचे ''नेहू दा व्याह'' हे गाणे देखील रिलीज झाले होते. या हिट गाण्यात ते पहिल्यांदाच एकत्र झळकले. हे गाणे प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाले आहे.