ETV Bharat / sitara

सॅनिटायझेशनच्या प्रसारासाठी सलमान खानने घेतला पुढाकार - सलमान खानचा मदतीसाठी हात

सलमान खानने आपला एक FRSH हा ब्रँड लॉन्च केला असून सॅनिटायझेशनसाठी खूप आवश्यक असल्याचे म्हटले आहे. सलमानने यापूर्वीच डिओडोरन्ट लॉन्च करण्याची योजना बनवली होती. मात्र सॅनिटायझर्स सुरू करणे ही या काळाची गरज असल्याचे त्याने म्हटलंय.

Salman Khan
सलमान खान
author img

By

Published : May 25, 2020, 2:54 PM IST

मुंबई - कोरोना व्हायरसच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी सॅनिटायझेशन खूप आवश्यक असल्याचे सुपरस्टार सलमान खानने म्हटले आहे. त्याने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केलाय. यात तो आपण एक FRSH हा ब्रँड लॉन्च केला असून सॅनिटायझेशनसाठी खूप आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

सलमानने यापूर्वीच डिओडोरन्ट लॉन्च करण्याची योजना बनवली होती. मात्र सॅनिटायझर्स सुरू करणे ही या काळाची गरज असल्याचे त्याने म्हटलंय. व्हिडिओच्या शेवटी सलमानने चाहत्यांना सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे.

कोरोना व्हायरसच्या संकटाच्या काळात सोशल डिस्टन्सिंगचे महत्त्व सांगणारे व्हिडिओ सलमानने आपल्या सोशल मीडियावरुन सातत्याने शेअर केले आहेत.

सलमान सध्या पनवेलच्या फार्म हाऊसमध्ये मुक्कामाला आहे. लॉकडाऊनपासून तो इथेच थांबला असून लोकांना मदत करण्यासाठी त्याने अनेक बाबी केल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.