मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री जेनेलिया डिसूझाने तिचा नवरा आणि अभिनेता रितेश देशमुखसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. एखादी रंजक कथा मिळाली तर ही इच्छा प्रत्यक्षात आणू शकते असे तिने म्हटलंय.
२००३ मध्ये जेनेलिया आणि रितेश यांची भेट तुझे पहिला मेरी कसम या बॉलिवूड चित्रपटाच्या सेटवर झाली. यानंतर ही जोडी 'मस्ती' (२००४) आणि 'तेरे नाल प्यार हो गया' (२०१२) सारख्या चित्रपटांमध्येही दिसली होती.
येत्या काळात हे दोघे कोणत्या प्रकारच्या चित्रपटात एकत्र येऊ शकतात? याबद्दल जेनेलियाने सांगितले , "बराच काळ उलटला आहे. मला आशा आहे की आम्हाला एकत्र काम करण्याची संधी मिळेल पण मी सध्या एक रंजक स्क्रिप्ट वाचत आहे."
यावर प्रतिक्रिया देताना रितेशने म्हटलंय, ''याला होकार देऊन टाक.''
जेनेलिया आणि रितेशचे 2012 मध्ये लग्न झाले होते. त्यांना राहिल व रियान ही दोन मुले आहेत.