मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहलीची जोडी सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. सोशल मीडियावर बर्याचदा दोघांचे क्यूट फोटो पाहिले जातात. सध्या त्यांचे काही जुने फोटो इंटरनेटवर जोरदार व्हायरल होत आहेत. क्रिकेटर झहीर खान आणि सागरिका घाटगे यांच्या लग्नातील त्यांचा हा फोटो सध्या चर्चेत आहे. या फोटोमध्ये विराट आपली पत्नी अनुष्का शर्माचा स्कार्फ खेचताना दिसत आहे. फोटोमध्ये दोघेही रोमँटिक मूडमध्ये असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीचा हा सुंदर रोमँटिक फोटो विराट अनुष्काच्या फॅन पेजवर शेअर करण्यात आला आहे. या फोटोंमध्ये विराट कोहली मिश्किल मूडमध्ये दिसत आहे. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोंवर लाखो लाईक्स आल्या आहेत.
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी २०१७ मध्ये लग्नगाठ बांधली होती. २०२१ या वर्षाच्या सुरुवातीला दोघांनीही मुलीला जन्म दिला आहे. अनुष्का शर्माच्या कामाविषयी बोलायचे तर ती शेवटच्यावेळी शाहरूख खानच्या 'झिरो' चित्रपटात दिसली होती. या व्यतिरिक्त अलीकडेच तिच्या प्रॉडक्शन बॅनरखाली बनवलेला 'बुलबुल' हा चित्रपट आला होता. हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर रिलीज झाला होता. यापूर्वी अनुष्का शर्मा निर्मित 'पाताल लोक' ही वेब सीरिजही अमेझॉन प्राईम व्हिडिओवर रिलीज झाली होती.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हेही वाचा - 'उरी'ची अभिनेत्री 'ईडी'च्या रडारवर, यामी गौतमची ७ जुलैला होणार चौकशी