मुंबई - आशिकी गर्ल श्रद्धा कपूर सध्या 'साहो' सिनेमामुळे चांगलीच चर्चेत आहे. या सिनेमाच्या माध्यमातून ती दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. आपल्या या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र असणाऱ्या श्रद्धाचा एक व्हिडिओ आता समोर आला आहे.
या व्हिडिओमध्ये श्रद्धा छायाचित्रकारांसोबत मराठीमध्ये संवाद साधताना दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ प्रत्येक मराठी प्रेक्षकाची मनं जिंकणारा आहे. श्रद्धा शिवांगी कोल्हापुरे यांची मुलगी असल्यामुळे ती सुरुवातीपासून मराठी वातावरणात वाढली आहे. यासोबतच अनेक वर्ष आजी - आजोबांसोबत घालवल्यामुळे तिला मराठी भाषा अवगत आहे.
- View this post on Instagram
#shraddhakapoor snapped at #chichore promotion in mumbai today #viralbayani @viralbhayani
">
चित्रपटांबद्दल बोलायचं झाल्यास, श्रद्धाचा साहो सिनेमा येत्या ३० ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. साहोशिवाय ती स्ट्रीट डान्सर या सिनेमातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. डान्सवर आधारित या सिनेमात ती अभिनेता वरुण धवनसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.