मुंबई - अभिनेता हृतिक रोशनचा आगामी चित्रपट "विक्रम वेधा" 30 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. सोमवारी हृतिकच्या वाढदिवसानिमित्त ( Hrithik Roshan 48th birthday ) चित्रपट निर्मात्यांनी यासंदर्भात एक घोषणा केली आहे. निर्मात्यांनी हृतिकच्या ४८व्या वाढदिवसानिमित्त वेधा चित्रपटातील अभिनेत्याचा फर्स्ट लूक ( first look of Vedha ) रिलीज केला आहे. या चित्रपटात हृतिक गँगस्टर वेधाची भूमिका साकारणार आहे.
-
Here's wishing Hrithik Roshan a very happy birthday!
— T-Series (@TSeries) January 10, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Delighted to present the first look of Vedha in #VikramVedha.
Hitting the cinemas worldwide on 30th September 2022. #VedhaFirstLook #VikramVedha #HappyBirthdayHrithikRoshan@iHrithik #SaifAliKhan @radhika_apte pic.twitter.com/xfjxx4hip4
">Here's wishing Hrithik Roshan a very happy birthday!
— T-Series (@TSeries) January 10, 2022
Delighted to present the first look of Vedha in #VikramVedha.
Hitting the cinemas worldwide on 30th September 2022. #VedhaFirstLook #VikramVedha #HappyBirthdayHrithikRoshan@iHrithik #SaifAliKhan @radhika_apte pic.twitter.com/xfjxx4hip4Here's wishing Hrithik Roshan a very happy birthday!
— T-Series (@TSeries) January 10, 2022
Delighted to present the first look of Vedha in #VikramVedha.
Hitting the cinemas worldwide on 30th September 2022. #VedhaFirstLook #VikramVedha #HappyBirthdayHrithikRoshan@iHrithik #SaifAliKhan @radhika_apte pic.twitter.com/xfjxx4hip4
चित्रपट निर्माता कंपनी ‘टी-सीरीज’ने ( T Series ) ने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर लिहिले आहे की, "हृतिक रोशनला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, विक्रम वेधा या चित्रपटाचा पहिला लूक प्रदर्शित करताना आम्हाला आनंद होत आहे. हा चित्रपट 30 सप्टेंबर 2022 रोजी जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे'.
विक्रम आणि बेताल या भारतीय लोककथेवर आधारित असलेला हा चित्रपट विक्रम या कठोर पोलीस अधिकाऱ्याची कथा आहे. जो शक्तिशाली गुंड वेधाला पकडतो आणि मारतो. या चित्रपटात सैफ अली खान विक्रमची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात राधिका आपटेही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
'विक्रम वेधा' हा त्याच नावाच्या तमिळ ब्लॉकबस्टर चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. आर माधवन आणि विजय सेतुपती यांनी तमिळ चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. तमिळ चित्रपटाचे दिग्दर्शन करणारे पुष्कर आणि गायत्री हे विक्रम वेधाच्या हिंदी रिमेकचे दिग्दर्शक आहेत. याची निर्मिती एस शशिकांत आणि भूषण कुमार यांनी केली आहे.
हेही वाचा - Hbd हृतिक रोशन: व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी ३० हजार लग्नाचे आले होते प्रस्ताव