ETV Bharat / sitara

अर्जुन रेड्डी फेम विजयच्या निर्मितीत बनणाऱ्या पहिल्या सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित - इन्स्टाग्राम

विजयनं आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण करण्याचं कारण सांगितलं आहे. जेव्हा आपल्याला चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यासाठी अनेक समस्यांचा सामना करावा लागतो आणि प्रचंड मेहनत घ्यावी लागते, ही गोष्ट खूप वेदनादायी असते

विजयचं निर्मिती क्षेत्रात पाऊल
author img

By

Published : Aug 29, 2019, 10:00 PM IST

मुंबई - दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा आपल्या अर्जुन रेड्डी सिनेमामुळे चर्चेत आला. विजयच्या या सिनेमाच्या हिंदी रिमेकला म्हणजेच कबीर सिंगलाही प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. अभिनयात आपलं नशीब आजमावून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवल्यानंतर विजय आता निर्मिती क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे.

नुकतंच त्याच्या निर्मितीत बनणाऱ्या या पहिल्या चित्रपटाची घोषणा झाली होती. यानंतर आता या सिनेमाचं पहिलं पोस्टरही प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. मीकू मात्रमे चेप्ता असं या सिनेमाचं शीर्षक असून हा एक तेलुगू चित्रपट असणार आहे. शमीर सुलतान हे या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत.

विजयनं आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण करण्याचं कारण सांगितलं आहे. जेव्हा आपल्याला चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यासाठी अनेक समस्यांचा सामना करावा लागतो आणि प्रचंड मेहनत घ्यावी लागते, ही गोष्ट खूप वेदनादायी असते. म्हणूनच मी निर्णय घेतला होता, की ज्यादिवशी मी काहीतरी बनेल, तेव्हा मी एक प्रोडक्शन हाऊस सुरु करेल. ही गोष्ट आव्हानात्मक आहे, याची मला कल्पना आहे. मात्र, आव्हानांशिवाय आयुष्य काय? म्हणूनच आतापर्यंत जमा झालेल्या पैशातून मी किंग ऑफ द हिल्स प्रोडक्शन हाऊस तुमच्यासमोर घेऊन येत आहे, असं विजयनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Intro:Body:

ent

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.