ETV Bharat / sitara

अनन्या पांडे, विद्या बालन आणि सान्या मल्होत्राने स्वीकारले 'टंग ट्विस्टर' चॅलेंज - Sanya Malhotra latest news

''गुलाबो की खटर पटर से तितर बितर सिताबो, सिताबो की अगर मगर से उथल पुथल गुलोबा'' हे वाक्य सलग पाचवेळा म्हणण्याचे टंग ट्विस्टर चॅलेंज आहे. अनन्या पांडे, विद्या बालन आणि सान्या मल्होत्रा या बॉलिवूड सिताऱ्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करुन हे चॅलेंज स्वीकारले आहे.

Gulabo Sitabo tongue twister challenge
टंग ट्विस्टर चॅलेंज
author img

By

Published : Jun 12, 2020, 1:49 PM IST

मुंबई - अमिताभ बच्चन यांनी दिलेल्या 'गुलाबो सिताबो' टंग ट्विस्टर चॅलेंजमध्ये आतापर्यंत अनेक सेलेब्रिटीजनी सहभाग घेतलाय. आता यामध्ये अनन्या पांडे, विद्या बालन आणि सान्या मल्होत्रा याही सहभागी झाल्या आहेत.

''गुलाबो की खटर पटर से तितर बितर सिताबो, सिताबो की अगर मगर से उथल पुथल गुलोबा'' हे वाक्य सलग पाचवेळा म्हणण्याचे हे टंग ट्विस्टर चॅलेंज आहे. 'गुलाबो सिताबो' या अमिताभ आणि आयुष्यमान खुराणाच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हे चॅलेंज देण्यात आले होते.

अनन्या पांडे, विद्या बालन आणि सान्या मल्होत्रा या बॉलिवूड सिताऱ्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर व्हीडिओ पोस्ट करून हे चॅलेंज स्वीकारले आहे.

'पती पत्नी और वोह' या सिनेमामुळे चर्चेत आलेल्या अनन्या पांडेने वरील वाक्य सलग म्हणत एक व्हीडिओ पोस्ट केलाय. याचा अखेरही तिने अनोख्या पद्धतीने केल्याचे दिसते.

विद्या बालनने आकर्षक दृष्य असलेल्या टेरेसवरुन शूट केलेला दिसतो. जिभेला सतत वळण देणाऱ्या या चॅलेंजचा सामना तिने उत्तम केलाय आणि अत्यंत हासऱ्या चेहऱ्याने याचा शेवटही केल्याचे दिसते.

विद्या आणि अनन्याने हे चॅलेंज वन टेक पूर्ण केले असले तरी 'दंगल गर्ल' सान्या मल्होत्रासाठी हे चॅलेंज सोपे नव्हते. मात्र धडपडत तिने या आव्हानाला भिडत अखेर हे चॅलेंज पूर्ण केले.

शुजित सरकार यांनी दिग्दर्शित केलेल्या 'गुलाबो सिताबो' चित्रपटात अमिताभ आणि आयुष्यमान खुराणा पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करीत आहेत. हा चित्रपट १७ एप्रिलला रिलीज होणार होता. मात्र लॉकडाऊनमुळे थिएटर बंद असल्यामुळे याचे थेट स्क्रीनिंग ओटीटी प्लॅटफॉर्मवर करण्यात आले आहे. आजपासून म्हणजेच १२ जूनपासून हा सिनेमा प्राईम व्हीडिओवर पाहाता येणार आहे.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.