ETV Bharat / sitara

अष्टपैलुत्व आणि अपारंपरिक भूमिकांच्या निवडीमुळे विद्या बालनच होती ‘शेरनी’ साठी पहिली पसंती ! - विद्या बालनचा आगामी चित्रपट

द डर्टी पिक्चर' मधील सिल्क स्मिता असो किंवा 'कहानी' मधील विद्या बाघची भूमिका असो, तसेच, मागच्या वर्षीचा सिनेमा 'शकुंतला देवी' मधील गणितज्ञ-भूमिका असो किंवा 'तुम्हारी सुलू' मधील आरजे असो, या अष्टपैलू अभिनेत्रीने आपल्या प्रत्येक भूमिकेचे सोने केले आहे. अभिनयातील अष्टपैलुत्व आणि अपारंपरिक भूमिका निवडण्याची शैली असल्यामुळे विद्या बालनच होती ‘शेरनी’ साठी पहिली पसंती असे निर्मात्यांनी सांगितले आहे.

http://10.10.50.85:6060//finalout4/maharashtra-nle/thumbnail/09-June-2021/12077202_451_12077202_1623256405462.png
विद्या बालन
author img

By

Published : Jun 9, 2021, 10:07 PM IST

अभिनेत्री विद्या बालन ने नेहमीच आपल्या भूमिका निवडीबाबत चोखंदळपणा दर्शविला आहे. 'द डर्टी पिक्चर' मधील सिल्क स्मिता असो किंवा 'कहानी' मधील विद्या बाघची भूमिका असो, तसेच, मागच्या वर्षीचा सिनेमा 'शकुंतला देवी' मधील गणितज्ञ-भूमिका असो किंवा 'तुम्हारी सुलू' मधील आरजे असो, या अष्टपैलू अभिनेत्रीने आपल्या प्रत्येक भूमिकेचे सोने केले आहे आणि सिनेमाप्रेमींना चकित करून, बॉलिवूड मध्ये स्वतःसाठी एक वेगळे स्थान बनविले आहे.

Vidya Balan
विद्या बालन शेरनीमध्ये

‘शेरनी’ च्या निर्मात्यांना तिचे हेच गुण आवडले होते आणि त्यांनी सर्वप्रथम तिलाच ‘शेरनी’ चे कथानक ऐकविले होते. ‘अभिनयातील अष्टपैलुत्व आणि अपारंपरिक भूमिकांची निवड यामुळे विद्या बालन ‘शेरनी’ साठी पहिली पसंती होती. तिच्या अपारंपरिक भूमिकांच्या निवडीमुळेच ती ह्या चित्रपटासाठी सर्वोत्तम आहे’ असे ते छातीठोकपणे सांगतात. महत्वाचं म्हणजे भूमिकांबाबत इतका चोखंदळपणा दाखविणारी ती पहिलीच अभिनेत्री असावी असेही ते सांगतात.

विद्याचे अष्टपैलुत्व, भावनिक कलाकुसर, भूमिकेतील तिचे समर्पण आणि तिने केलेल्या प्रत्येक भूमिकेबद्दलची तिची आस्था आणि आपलेपणा, या कारणांमुळेच, निर्माते भूषण कुमार आणि विक्रम मल्होत्रा यांनी बहूपुरस्कार विजेते दिग्दर्शक अमित मसुरकर यांच्या ‘शेरनी’ चित्रपटातील प्रमुख भूमिकेसाठी तिची बिनदिक्कत निवड केली. मानव-प्राण्यांच्या संघर्षावर आधारित या चित्रपटात, हिंदी चित्रपटसृष्टीत प्रथमच वन अधिकाऱ्याची भूमिकेत विद्या दिसणार आहे. या चित्रपटाचा अंतिम कट पाहून निर्माते त्यांच्या निवडीबाबत गर्वित झाले आहेत. त्यांच्या मते विद्याने यात बहु-स्तरीय व्यक्तिरेखा साकारली आहे जी अत्यंत कठीण पण भेद्य आहे, निर्भय असूनही नरम आहे.

Vidya Balan
शेरनी पोस्टर

अबंडनशीया एंटरटेनमेंटचे निर्माते विक्रम मल्होत्रा या अभिनेत्रीचे कौतुक करताना म्हणतात की, "विद्या एक अपवादात्मक अभिनेत्री आहे आणि तिने गेल्या १६ वर्षांत जी कामे केली आहेत त्याने तिचा स्वतःचा असा एक वेगळा प्रेक्षकवर्ग तयार केलाय. ‘शकुंतला देवी’ साठी एकत्र काम करताना मी स्वतः पाहिले आहे की तिने स्वत: ला त्या गुंतागुंतीच्या भूमिकेच्या साच्यात कसे झोकून दिले होते आणि प्रत्येक तपशीलात बारकाईने कसे लक्ष घातले होते. आमच्यासाठी ‘शेरनी’ विद्याच आहे."

टी-सीरिज चे भूषण कुमार म्हणाले, “तुम्हारी सुलू या चित्रपटावर विद्याबरोबर काम करताना आम्हाला खूप भारदस्त वाटलं होतं. ती एक समर्पित अभिनेत्री आहे आणि कलेवर असणार तिचं नितांत प्रेम स्क्रीनवर झळकते. विद्याबरोबर काम करणं म्हणजे नेहमीच मजेदार आणि शिकण्याचा एक चांगला अनुभव असतो. ती प्रत्येक दिग्दर्शकाचीच नाही तर प्रत्येक निर्मात्याचीही आवडती अभिनेत्री आहे.”

भूषण कुमार, कृष्ण कुमार, विक्रम मल्होत्रा आणि अमित मसुरकर निर्मित ‘शेरनी’ १८ जून २०२१ पासून अमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रवाहित होईल.

हेही वाचा - विक्की आणि कॅटरिना 'प्रेमीयुगुल', हर्षवर्धन कपूरने दिला दुजोरा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.