मुंबई - बॉलिवूड अॅक्शन स्टार आणि फिटनेस आयकॉन टायगर श्रॉफने पाठीच्या दुखापतीनंतरही बॅकफ्लिप करून चाहत्यांना आश्चर्य चकित केले आहे. टायगरने सोमवारी मोटिवेशनचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.
व्हिडिओमध्ये टायगर शर्टलेस आणि ग्रीन योगा पँट्समध्ये वारंवार बॅकफ्लिप्स करताना दिसत आहे.
त्याने या व्हिडिओला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, "अजूनही पूर्ण वेगवान नाही, परंतु जखमी शरीरालाही हानिकारक नाही."
- View this post on Instagram
Not full speed yet...but not bad for an injured body🥵...#mondaymotivation
">
हेही वाचा - 'सूरज पे मंगल भारी' १५ नोव्हेंबरला मोठ्या पडद्यावर रिलीजसाठी सज्ज
अभिनेता टायगर श्रॉफने नुकतेच एक पोस्ट शेअर केले आहे ज्यात तो ‘गणपथ’ नावाच्या महामारीच्या पार्श्वभूमीवर आधारित अॅक्शन फिल्ममध्ये दिसणार आहे. 'गणपथ' या चित्रपटाचा टिझर रिलीज झाला आहे. या टीझरमध्ये टायगर श्रॉफची स्टाईल त्याच्या चाहत्यांना आवडली आहे. विकास बहल यांनी 'गणपथ' दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाची निर्मिती वशु भगनानी, विकास बहल, दीपशिखा देशमुख आणि जॅकी भगनानी करत आहेत. २०२१मध्ये ''गणपथ'चे शूटिंग सुरू होईल आणि २०२२पर्यंत प्रदर्शित होईल.
'गणपथ' या चित्रपटात टायगर श्रॉफची नायिका कोण राहिली याचा अद्याप खुलासा झालेला नाही. या चित्रपटाचा फक्त मुख्य अभिनेता समोर आला आहे. टायगर श्रॉफला जबरदस्त बॉडी पाहून चित्रपटात भरपूर अॅक्शन पाहायला मिळेल असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
हेही वाचा - हिट चित्रपटांमुळे नाही तर, परफॉर्मन्समुळे लोकांनी ओळखावे - दिव्येंदू शर्मा
टायगर श्रॉफच्या 'बागी 4' या चित्रपटाचीही घोषणा झाली आहे. 'बागी 4'चे शूटिंग डिसेंबरमध्ये सुरू होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक अहमद खान यांनी नुकतीच याबाबत माहिती दिली. इतकेच नाही तर टायगर श्रॉफच्या 'हीरोपंती 2'चे शूटिंगही लवकरच सुरू होणार आहे. टायगर श्रॉफच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलताना आपल्याला बर्याच अॅक्शन्स पाहायला मिळतील.