मुंबई - विकी कौशलने (Vicky Kaushal Images) लग्नानंतर पुन्हा कामाला सुरुवात केली आहे. तो गेल्या काही दिवसांपासून खूप सक्रिय आहे. तसेच, तो सोशल मीडियावर चाहत्यांशी कनेक्ट होत असतो. "उरी - द सर्जिकल स्ट्राइक" फेम विकी कौशलने शुक्रवारी सोशल मीडियावर स्वतःचा एक फोटो शेअर केला. या फोटोत विकीची जबरदस्त बॉडी पाहायला मिळते. विकीच्या या फोटोवर चाहत्यांनी भन्नाट कमेंट केल्या (Vicky Kaushal Fan Comments) आहेत.
विक्की कौशलने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या छायाचित्रात त्याचे बायसेप्स दिसत आहे. टोपी घालून उभा असलेला विकी कौशल, टी-शर्टमध्ये हँडसम दिसत आहे. विकीच्या या फोटोवर चाहते त्याचे कौतुक करत आहेत.
'कतरिना कैफचा नवरा अॅटम बॉम्ब'
विकीच्या एका चाहत्याने लिहिले की,' हा लूक जबरदस्त दिसत आहे'. एका चाहत्याने लिहिले की, 'कतरिना कैफचा नवरा अॅटम बॉम्ब आहे'. एका यूजरने लिहिले, 'आता तुझे लग्न झाले आहे, असे फोटो लावू नकोस'. विक्कीच्या या फोटोला तीन तासात जवळपास 10 लाख लाइक्स आले आहेत. विकी कौशलने 9 डिसेंबर 2021 रोजी राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्ट बरवारा येथे अभिनेत्री कतरिना कैफसोबत लग्न केले. या लग्नाला दोघांचे फक्त नातेवाईक आणि काही खास मित्र उपस्थित होते.
हेही वाचा - पाहा, डान्स 'गुरु'सोबत मुलायम थिरकताना टायगर श्रॉफचा व्हिडिओ