मुंबई - उरी - द सर्जिकल स्ट्राईक या चित्रपटातील भूमिकेमुळे विकी कौशल सिने जगतात चर्चेचा विषय ठरला. या चित्रपटाच्या शूटींगच्यावेळी जोश कायम रहावा यासाठी टीमने कशी मेहनत घेतली याबद्दलची पोस्ट त्याने सोशल मीडियावर शेअर केली आहे. उरी हा चित्रपट ११ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला होता.
विकीने एक फोटो शेअर करीत लिहिले आहे, "८ जून. बरोबर एक वर्षापूर्वी आम्ही उरीच्या शूटींगला सुरुवात केली होती. त्यानंतरचे वर्ष भन्नाट होते. आजपर्यंतच्या सर्वात उत्तम रोलर कोस्टर राईडचा मी अनुभव घेतला."
तो पुढे लिहितो, ''अगोदर एक आठवडा आम्ही ऑफिसच्या बाल्कनीत बसून उरीला यश मिळेल की नाही यावर चर्चा करीत होतो. प्रत्येकजण तणावाखाली होता हे मला आठवते आणि आम्ही प्रत्येकजण खर्च कसा कमी होईल यावर मेहनत घेत होतो.''
विकी कोशल आणि मोहित रैनासह २० इतर कलाकार कष्टदायी फिजीकल ट्रेनिंग घेत होते. यामी गौतम हिेनेदेखील चित्रपटासाठी आपले केस कापल्याचे त्याने पुढे लिहिलंय.
या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिल्याबद्दल विकीने सर्वांचे मनापासून आभार मानले आहे.