मुंबई - अभिनेता विकी कौशल (Actor Vicky Kaushal) आणि कॅटरिना कैफ (Katrina Kaif) यांच्या लग्नाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे जोडपे डिसेंबरमध्ये सात फेरे घेणार आहे. आता एका नवीन रिपोर्टनुसार, विकी कौशल आणि कॅटरिना पुढच्या आठवड्यात कोर्ट मॅरेज करू शकतात.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, विकी आणि कॅटरिना पुढील आठवड्यात मुंबईत कोर्ट मॅरेज करणार आहेत. यानंतर हे जोडपे राजस्थानमध्ये त्यांच्या रॉयल वेडिंगसाठी रवाना होतील. विकी आणि कॅटरिनाची टीम आधीच घटनास्थळी पोहोचली असून सर्व तयारी पाहत आहे. टीमने लग्नाची सर्व व्यवस्था पाहिली आहे. याशिवाय या ठिकाणाची रेकीही करण्यात आली आहे.
कॅटरिना आणि विकी राजस्थानमधील सिक्स सेन्स फोर्टमध्ये लग्न करणार
कॅटरिना कैफ आणि विकी कौशल राजस्थानच्या सवाई माधोपूर जिल्ह्यातील सिक्स सेन्स फोर्ट हॉटेलमध्ये लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. 7 ते 12 डिसेंबर दरम्यान लग्नसोहळा चालणार असून लग्नासाठी हॉटेल बुकिंग आधीच झाले आहे. मात्र, त्याची औपचारिक घोषणा होणे बाकी आहे. व्हीआयपी लग्नाचे आयोजन करण्यासाठी अनेक इव्हेंट कंपन्या एकत्र काम करतील. अधिकाऱ्यांनी पुष्टी केली की वेगवेगळ्या कंपन्यांना वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी नियुक्त केले जात आहे. या इव्हेंट कंपन्यांनीही आपले काम जोरात सुरू केले आहे.
त्याचबरोबर कॅटरिना आणि विकी कौशलच्या टीमनेही लग्नाची तयारी सुरू केली आहे. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी 10 सदस्यांची टीम आदल्या दिवशी सिक्स सेन्स बर्वरा किल्ल्यावर पोहोचली होती. हॉटेल व्यवस्थापनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, टीमने लग्नाशी संबंधित सर्व व्यवस्थेवर लक्ष ठेवले आहे. मिरवणुकीच्या आगमनापासून मेहंदी, हळदीकुंकूपर्यंतच्या सजावटीची व्यवस्था या पथकाने पाहिली. मात्र, लग्नाचे कार्यक्रम अद्याप जाहीर झालेले नाहीत.
वधू-वराच्या पोशाखांना दिले जातंय अंतिम रूप
कॅटरिना कैफ आणि विकी कौशल त्यांच्या वधू- वराच्या पोशाखांची चाचणी घेत आहेत. कॅटरिना -विक्कीच्या पाहुण्यांच्या यादीत वरुण धवन, रोहित शेट्टी, करण जोहर, अली अब्बास जफर, कबीर खान, मिनी माथूर, सिद्धार्थ मल्होत्रा, कियारा अडवाणी आणि नताशा दलाल यांचा समावेश आहे.
दिग्दर्शक कबीर खानच्या मुंबईतील घरी दिवाळीच्या दिवशी विकी आणि कॅटरिनाचा रोका समारंभ होता, ज्यामध्ये फक्त जवळच्या कुटुंबातील सदस्यांना आमंत्रित करण्यात आले होते.
हेही वाचा - अभिनेता पुल्कित माकोल 'युअर ऑनर 2 साठी गोव्यात घेतले कल्लरिपयट्टूचे प्रशिक्षण!